
सोनू सूद सध्या त्याच्या आगामी चित्रपट 'फतेह'साठी चोवीस तास काम करताना दिसत आहे. सोनू सूद या चित्रपटात नव्या लूकमध्ये दिसणार आहे आणि त्याने यापूर्वी त्याच्या कोणत्याही चित्रपटात न केलेले काहीतरी करणार असं कळतंय .
फतेह हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत वैभव मिश्रा . 'फतेह'मध्ये सोनू सूदच्या सोबत झळकतेय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस. सोनू सूद सध्या सर्व अॅक्शन सीन्स शूट करत आहे. या चित्रपटात अनेक अॅक्शन सीन्स पाहायला मिळतील.
सोनू सूद त्याच्या भूमिकेसाठी फिट तर राहतो आहे पण या चित्रपटासाठी तो खास तयारी करताना दिसतोय. त्याच्या सोशल मीडियावर त्याने एक खास व्हिडिओ शेअर केला. ज्यात त्याचे बायसेप्स पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल . रोज ७-८ तास तो जिममध्ये ट्रेनिंग घेत आहे आणि कसून मेहनत घेत आहे .
अलीकडेच सोनू सूद आणि जॅकलीन यांनी अफलातून स्टंट्स केल्याच्या बातम्या आल्या आहेत. सोनूच्या नव्या कामासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.