बिहारमध्ये 'सोनू सूद इंटरनॅशनल स्कूल'ची स्थापना

अनाथ मुलांसाठी सोनूचं नवं पाऊल
बिहारमध्ये 'सोनू सूद इंटरनॅशनल स्कूल'ची स्थापना

27 वर्षीय बिहार अभियंता बिरेंद्र कुमार महातो हा तरुण अनाथ मुलांसाठी शाळा उघडण्यासाठी आपली पूर्णवेळ नोकरी सोडतो हे वाचून सोनू सूद आश्चर्यचकित झाला. या तरुणाने या शाळेचं नाव सोनू सूद ठेवलंय. 110 मुलांना मोफत शिक्षण आणि त्यांना जेवण देण्याचा या महत्त्वपूर्ण कामाने सोनू प्रेरित झाला आणि सोनूने महतो आणि शाळेतील मुलांची भेट घेतली.

शाळेतील मुलांच्या गरजा समजून घेण्यासाठी या अभिनेत्याने महतोसोबत खास वेळ घालवला. रेशनपासून ते दर्जेदार शिक्षणापर्यंत समाजात जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील शैक्षणिक दरी कमी करण्यासाठी सोनू प्रयत्न करणार आहे. सोनू सूदने या शाळेसाठी नवीन इमारतीचे काम सुरू केले असून अनेक वंचित मुलांना येथे राहता येईल आणि शाळेत प्रत्येक मुलासाठी जेवण उपलब्ध होईल याची खात्री घेतली जाणार आहे. 'सोनू सूद इंटरनॅशनल स्कूल' लवकरच सुरु होईल.

" मुलांना शिकवून गरिबीचा सामना करणं हा एक उत्तम मार्ग आहे. समाजातील उपेक्षित घटकांतील मुलांना शिक्षित करणे हे आमचे ध्येय आहे जेणेकरून त्यांना नोकरीच्या अधिक चांगल्या संधी मिळतील. उच्च शिक्षण ही अशी गोष्ट आहे ज्यावर आम्ही काम करत आहोत. त्यांच संगोपन उत्तम रित्या व्हावं आणि त्यांचा विकास व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. ही शाळा देखील वंचित मुला साठी एक रात्र निवारा आहे " अस सोनू सांगतो.

सध्या सूद देशभरात सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in