Sonu Sood : सोनू सूद याने चालत्या रेल्वे दरवाज्याजवळ बसून प्रवास करत व्हिडिओमुळे चांगलाच ट्रोल

अभिनेता सोनू सूद याने चालत्या रेल्वे दरवाज्याजवळ बसून प्रवास करत असल्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याच्या या ट्विटनंतर
Sonu Sood :  सोनू सूद याने चालत्या रेल्वे दरवाज्याजवळ बसून प्रवास करत व्हिडिओमुळे चांगलाच ट्रोल

धावत्या रेल्वेमध्ये चढू-उतरू नका, रेल्वे रूळ ओलांडू नका, दरवाज्याजवळ उभे राहू नका अशा प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासनाकडून सतत उद्घोषणा करण्यात येतात. मात्र तरी देखील प्रवासी या सूचनांकडे दुर्लक्ष करतात आणि मृत्यूला आमंत्रण देतात. या अशा घटना टाळण्यासाठी अभिनेते, व्यावसायिक यांना मधल्या काळात रेल्वेने राजदूत म्हणून आमंत्रित केले होते. मात्र दुसऱ्या बाजूला कोरोनाकाळात अनेक नागरिकांचा, कुटुंबांचा कैवारी ठरलेला सिने अभिनेता सोनू सूद याने चालत्या रेल्वे दरवाज्याजवळ बसून प्रवास करत असल्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर टीकास्त्र सोडले जात आहे.

कोरोनाकाळात देशातील टाळेबंदीदरम्यान अनेकांसाठी मदतीला धाऊन आलेला अभिनेता सोनू सूद सतत चर्चेत असतो. नुकताच १३ डिसेंबर रोजी सोनू सूदने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये सोनू सूद चालत्या ट्रेनच्या दरवाज्याच्या जवळ बसलेला दिसत आहे. २२ सेकंदाच्या या व्हिडिओमुळे सोनू सूद चांगलाच ट्रोल झाला आहे. सर्वसामान्य प्रवाशांचा रोज अशा नको त्या स्टंटमुळे जीव जात असताना अभिनेता सोनू सूद ज्याप्रकारे ट्रेनच्या दरवाजा जवळ बसला आहे ते खूप भीतीदायक आहे. यामुळे इतर प्रवासी चाहते अशाप्रकारे स्टंट कारतण्याची भीती नाकारता येणार नाही. दरम्यान, या त्याच्या ट्विटनंतर व्हिडीओवर जीआरपी मुंबईने तात्काळ उत्तर देत ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले की, 'सोनू सूद फुटबोर्डवर प्रवास करणे चित्रपटांमध्ये मनोरंजनाचे आहे. मात्र खऱ्या आयुष्यात नाही. आपण सर्वानी नियमांचे पालन करूया आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा... जीआरपीच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावर अनेकांनी सोनू सूदला सल्ले दिल्याचे निदर्शनास आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in