लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीची प्रकृती बिघडली; ICUमध्ये दाखल: रंग अन् वजनामुळे झाले होते ट्रोल

महालक्ष्मी तिच्या लग्नानंतर खूप चर्चेत आली होती. पती रविंद्र चंद्रशेखर यांना यांच्या रंग आणि वजनावरुन ट्रोल करण्यात आले होते.
लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीची प्रकृती बिघडली; ICUमध्ये दाखल: रंग अन् वजनामुळे झाले होते ट्रोल

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोकप्रिय तमिळ अभिनेत्री महालक्ष्मी हिचे पती रविंद्र चंद्रशेखर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात(ICU) दाखल करण्यात आल्याचे समजते. महालक्ष्मी तिच्या लग्नानंतर खूप चर्चेत आली होती. पती रविंद्र चंद्रशेखर यांना रंग आणि वजनावरुन ट्रोल करण्यात आले होते.

रविंद्र चंद्रशेखर हे प्रसिद्ध निर्माते असून ते लिब्रा प्रोडक्शनचे मालक आहेत. त्यांना श्वास घेण्यास त्रास येत असल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. फुफ्फुसाचे इन्फेक्शन झाल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना एका आठवड्यासाठी आयसीयूत रहावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

चाहत्यांनी केली काळजी घेण्याची विनंती-

रविंद्र यांची प्रकृती बिघडल्याची बातमी व्हायरल झाली असून चाहत्यांनी काळजी घेण्याची विनंती केली आहे. तसेच पूर्णपणे बरे होत नाही तोवर विश्रांती घेण्यास सांगितले. रविंद्र हे आपल्या यूट्यूब चॅनलवर बिग बॉसचा रिव्ह्यू देखील करतात. त्यांच्या रिव्ह्यूंना मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते.

लग्नामुळे झाले ट्रोल-

महालक्ष्मी ही रविंद्र यांची दुसरी पत्ती आहे. या लग्नापूर्वी रविंद्र यांचा घटस्फोट झाला होता. त्यांनी 2022 मध्ये टीव्ही अभिनेत्री महालक्ष्मीशी लग्न केले. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले होते. लोकांना हे जोडपे खूपच विचित्र वाटले होते. महालक्ष्मीने पैशासाठी रविंद्र यांच्याशी लग्न केल्याचेही लोकांनी म्हटले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in