आज प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्ताने आरती अंकालीकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. दरम्यान पत्नीच्या वाढदिवसानिमित्त उदय टिकेकर यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. उदय टिकेकर यांनी पत्नीबरोबरचा एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये ते आपल्या पत्नीच्या गालावर किस करताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करीत त्यांनी लिहिले, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको! खूप सारे प्रेम.” टिकेकर यांची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.
उदय टिकेकर मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर उदय टिकेकर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करीत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान, त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी शेअर केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.