शाहरुख खान तिरुपती बालाजीच्या दर्शनाला

'जवान' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दर्शनाला पोहोचला किंग खान
शाहरुख खान तिरुपती बालाजीच्या दर्शनाला

शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट आता प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. येत्या 7 सप्टेंबरला 'जवान' थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.चित्रपटात शाहरुख खानचा डबल रोल आहे अशी चर्चा आहे, ट्रेलरला देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी शाहरुख खान भारतभर फिरत आहे.

जवान चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी अनेक मंदिरांमध्ये देखील शाहरुख खान जात आहे. तो वैष्णोदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता. नुकताच तो थेट आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या तिरुपती बालाजीचे दर्शन करण्यासाठी पोहोचला आहे. यावेळी व्यंकटेश मंदिरात गेलेल्या शाहरुख खानसोबत त्याची मुलगी सुहाना खान आणि जवान चित्रपटातील अभिनेत्री नयनतारा देखील गेली होती.

शाहरुख खानचा हा व्हिडीओ एएनआयनं शेअर केला आहे. या व्हिडीओत किंग खान , सुहाना, नयनतारा आणि नयनताराचा पती विग्नेश शिवमसुद्धा दिसत आहे. शाहरुखला पाहताच त्याचे चाहते त्याला आवाज देत आहेत. त्यानंतर शाहरुख खान चाहत्यांच्या दिशेला अभिवादन करताना दिसत आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

logo
marathi.freepressjournal.in