SRK Birthday Celebration: वाढदिवशी शाहरुखच्या चाहत्यांना सुखद धक्का ; बहुचर्चित 'जवान' ओटीटीवर रिलीज

शाहरुखच्या 'जवान'चं एक्सटेंडेज वर्जन नेटफ्लिक्सयावर रिलीज करण्यात आलं आहे.
SRK Birthday Celebration: वाढदिवशी शाहरुखच्या चाहत्यांना सुखद धक्का ; बहुचर्चित 'जवान' ओटीटीवर रिलीज

बॉलीवूडचा किंग शाहरुख खान आज ५६ वर्षाचा झाला आहे. शाहरुखचे केवळ भारतातचं नाही तर संपूर्ण जगभरात त्याचे चाहते आहेत. जगभरातून आलेल्या त्याच्या चाहत्यानी मन्नतला भेट दिली आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्याची मन्नत बाहेर मध्यरात्री पासून गर्दी केली होती. शाहरुखच्या वाढदिवसाला काल संध्याकाळ पासूनच सुरुवात झाली होती. त्याचे चाहते हातात केक घेऊन त्याची वाट पाहत होते. एवढेचं नव्हे तर मन्नत बाहेर चाहत्यांनी फटाके फोडले, आतिषबाजी आणि घोषणा देखील दिल्या.

अखेर शाहरुख चाहत्यांना भेटायला बाहेर आला. शाहरुख आपल्या चाहत्यांना भेटायला ब्लॅक टीशर्ट, डोक्यावर टोपी, डोळ्यावर चष्मा अशा खास अंदाजात मन्नतबाहेर आला होता. त्याने नेहमीप्रमाणे सर्वांना अभिवादन केलं. शाहरुखला पाहताच मन्नतबाहेर एकच जल्लोष झाला. शाहरुखने सर्वांच्या प्रेमाचा स्वीकार केला.

आता शाहरुखनेही त्याच्या चाहत्यांना वाढदिवशी मनोरंजनाची 'ट्रीट' दिली दिली आहे. शाहरुखचा गाजलेला 'जवान' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. शाहरुखच्या 'जवान'चं एक्सटेंडेज वर्जन नेटफ्लिक्सयावर रिलीज करण्यात आलं आहे. 'जवान' हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेत पाहायला मिळणार आहे. किंग खानच्या वाढदिवशी चित्रपट ओटीटीवर रिलीज झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in