Pathaan : शाहरुख खानच्या 'पठाण'साठी सांगली, अमरावतीच्या चाहत्यांनी संपूर्ण सिनेमागृह केलं बुक

एकीकडे शाहरुख खानच्या 'पठाण'ला (Pathaan) विरोध होत असताना त्याचे चाहते मात्र त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत
Pathaan : शाहरुख खानच्या 'पठाण'साठी सांगली, अमरावतीच्या चाहत्यांनी संपूर्ण सिनेमागृह केलं बुक

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अशामध्ये त्याच्या 'पठाण' (Pathaan) या चित्रपटाला प्रदर्शित होण्यात अवघे काहीच दिवस उरले असताना. या चित्रपटामागील वाद काही कमी होण्याचे नाव घेत नाही. 'बेशरम रंग' या गाण्यामुळे वादात अडकलेल्या या चित्रपटाला देशभरातून विरोध होत आहे. अशामध्ये दुसरीकडे मात्र, त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता काही कमी झालेली नाही. याची प्रचिती सांगली आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आली. काही तरुणांनी संपूर्ण सिनेमागृहच बुक केले असल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'पठाण'चे ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाले असून आत्तापर्यंत प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, सांगलीतील एका तरुणाने हा चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण थिएटरच बुक केले आहे. याचा फोटो एसआरके फॅनक्लबने ट्विट केला आहे.

तर, दुसरीकडे अमरावतीमध्ये एका तरुणाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो पठाण पाहण्यासाठी संपूर्ण सिनेमागृह बुक करताना दिसत आहे. दरम्यान, २५ जानेवारीला हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित होणार असून देशभरातून ॲडव्हान्स बुकिंगला अपेक्षेपेक्षा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in