Golden Globes 2023 : कौतुकास्पद! RRR ची ग्लोबल भरारी; 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला गोल्डन ग्लोब

गोल्डन ग्लोब पुरस्कार २०२३मध्ये (Golden Globes 2023) एस.एस. राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाचा मोठा सन्मान
Golden Globes 2023 : कौतुकास्पद! RRR ची ग्लोबल भरारी; 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला गोल्डन ग्लोब
Published on

आज प्रसिद्ध गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globes 2023) सोहळ्याला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, आपल्या भारताकडून एस.एस. राजामौली (S S Rajamouli) यांच्या 'आरआरआर' (RRR) चित्रपटाला या सोहळ्यात २ नामांकने मिळाली होती. यामधील 'बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर' विभागामध्ये 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याने पुरस्कार पटकावला.

अशी कामगिरी करणारे हे पहिले भारतीयच नव्हे तर पहिले आशियाई गाणे ठरले आहे. यामुळे देशभरातून त्यांचे कौतुक होत आहे. तसेच, 'बेस्ट पिक्चर - नॉन-इंग्लिश' या विभागामध्येही नामांकन मिळाले आहे.

'नाटू नाटू' या गाण्याचे संगीत दिग्दर्शक एम एम कीरावानी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, "हा पुरस्कार आम्हाला दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मला याचा खूप आनंद होत आहे, माझी पत्नीदेखील यावेळी उपस्थित आहे. खरतर हा पुरस्कार माझा भाऊ, चित्रपटाचा दिग्दर्शक एस.एस. राजामौली याचाच आहे. त्याने माझ्या कामावर विश्वास ठेवून मला साथ दिली. याबद्दल मी त्याचा ऋणी आहे." यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्यासह अभिनेता राम चरण, ज्युनियर एनटीआरदेखील उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in