'सुभेदार' नावाच्या वादळाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ; दोन दिवसात केली तब्बल 'एवढी' कमाई

हा सिनेमा सध्या राज्यभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहेत.
'सुभेदार' नावाच्या वादळाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ; दोन दिवसात केली तब्बल 'एवढी' कमाई

सध्या मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच हवा करताना दिसत आहेत. सुरुवातीला 'वेड' त्यानंतर 'बाईपण भारी देवा' आणि आता बॉक्स ऑफिसवर एक नव वादळ घोंगावताना दिसत आहे. हे वादळ म्हणजे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा 'सुभेदार...गड आला पण...' हा चित्रपट. हा सिनेमा सध्या राज्यभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहेत.

लेखक-दिग्दर्शक-अभिनेता अलेले दिग्पाल लांजेकर पुन्हा एका सिने रसिकांना शिवकालीन इतिहासात नेण्यात यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे. 'सुभेदार' या चित्रपटावर चौहोबाजूंनी कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. प्रेक्षक देखील उत्साहात 'जय भवानी. जय शिवाजी'च्या घोषणा देत चित्रपट गृहात जाताना दिसत आहेत.

'सुभेदार' हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील शुरवीर योद्धे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत आहे. हा चित्रपट फक्त सिंहगडापूरता मर्यादीत नसून नुभेदार तानाजी मालुसरेंच्या संपूर्ण पात्राची ओळख करुन देणारा आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

शिवराज या अष्टकातल्या 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड', 'शेर शिवराज' या चारही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. त्यांतर आता पाचव्या भाग असलेल्या'सुभेदार' या सिनेमाला देखील प्रेक्षकांचं तसंच प्रेम मिळताना दिसत आहे. या सिनेमाने पहिल्याचं दिवशी १.२ कोटींची कमाई केली असून दुसऱ्या दिवशी या सिनेमाने १.७५ कोटींना हात पुरवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण २.८० कोटींची कमाई केली आहे.

या सिनेमात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, अभिजित श्वेतचंद्र, स्मिता शेवाळे, उमा सरदेशमुख, अलका कुबल, दिग्दर्शक मा. राजदत्त, दिग्पाल लांजेकर, अजिंक्य ननावरे, ऋषी सक्सेना, नूपुर पैठकणर, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, अर्णव पेंढरकर या कलांकारांच्या भूमिका आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in