Marathi Serial: मालिका विश्वात पहिल्यांदाच दिसणार AIचा वापर; येतेय सुबोध भावे आणि शिवानी सोनारची नवी मालिका

Subodh Bhave and Shivani Sonar: 'तू भेटशी नव्याने' ही सुबोध भावे आणि शिवानी सोनारची नवीन मालिका हटके लूकसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Marathi Serial: मालिका विश्वात पहिल्यांदाच दिसणार AIचा वापर; येतेय सुबोध भावे आणि शिवानी सोनारची नवी मालिका

Tu Bhetashi Navyane: ९० चं दशक म्हणजे मंतरलेला काळ होता. नव्वदीचे दशक फॅशन,सौंदर्य, टेलिव्हिजनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण संक्रमणाचा कालखंड होता. अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल होत होते. आजही त्या आठवणी अनेकांसाठी ताज्या आहेत. नव्वदीच्या दशकातील हा काळ आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

नव्वदीची फॅशन

नव्वदीचे दशक फॅशन आणि सौंदर्य ट्रेंडचा एक महत्त्वपूर्ण कालखंड ठरला. या काळातील बरेच ट्रेंड सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. बॉलिवूड सेलिब्रिटींनी सेट केलेल्या ट्रेंडला या काळात चांगली लोकप्रियता मिळाली. सोनी मराठी वाहिनीने या ट्रेंड चा अभ्यास करत त्याकाळातील फॅशन ट्रेंड ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेतून पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला आहे.

सुबोध भावे हा अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक. त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं नेहमीच कौतुक झाल्याचे पहायला मिळाले आहे. एखादी व्यक्तिरेखा अविस्मरणीय कशी करायची? हे या अभिनेत्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे. आता ते पुन्हा नव्या लुकमुळे चर्चेत आहेत ‘तू भेटशी नव्याने’ या शीर्षकाप्रमाणेच एका नव्या रूपात आपल्याला सुबोध भावे आणि शिवानी सोनार ही जोडी दिसणार आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रात्री ९.००वा. आपल्या भेटीला येणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in