सुबोध भावेने केलं 'ताली' वेब सिरिजचं कौतूक ; पोस्ट शेअर करत म्हणाला...

ही वेब सीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर जीवनावर आधारित आहे.
सुबोध भावेने केलं 'ताली' वेब सिरिजचं कौतूक ; पोस्ट शेअर करत म्हणाला...

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची बहुचर्चित अशी 'ताली' ही वेब सिरिज 15 ऑगस्ट रोजी जिओ सिनेमावर रिलिज झाली. तिच्या या वेब सिरीजची आतुरतेने वाट बघतली जात होती. काल १५ ऑगस्ट सारख्या शुभदिनी ही वेब सिरीज लोकांच्या भेटीला आली आहे. ही वेब सीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर जीवनावर आधारित आहे. या सीरीजमध्ये गौरी सावंत यांची भूमिका अभिनेत्री सुश्मिता सेनने साकारली आहे. सुश्मिता सेन तृतीयपंथीयांच्या वेशातया या वेब सिरीजमध्ये दिसत असून तिच्या कपाळावर मोठी टिकली, साडी आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ पाहायला मिळते.

'ताली' ही वेब सिरिज काल पासून खूप ट्रेंड करत आहे. अभिनेत्री सुश्मिता सेनला चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी ही वेब सिरीजबद्दल आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच मराठमोळा अभिनेता सुबोध भावेने देखील ही सिरिज बघितली आणि त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायम ऍक्टिव्ह असतो. नुकतंच सुबोधने 'ताली' या वेबसीरिजच्या पोस्टरचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबर त्याने या सिरिजमध्ये झळकलेल्या कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलला आहे. तसंच यातील कथानक आणि लेखन याबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली आहे. सुबोध भावे हा मराठी सिनेसृष्टीतला हरहुन्नरी अभिनेता आहे. सुबोध भावेने आजवर विविध भुमिका साकारुन मराठी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. तो कायम इतर कालाकारांच्या अभिनयाचं कौतुक करत असतो. सुबोध हा अलीकडेच 'फुलराणी' आणि 'वाळवी' सिनेमात दिसला होता. आता त्याने 'ताली' सिरिजबद्दल लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. अनेक लोकांनी त्याचे कौतुक केले आहे. ही सिरिज एकदा तरी नक्की पहावी, असं आवाहनही सुबोधने केलं आहे.

सुबोध भावेने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारीत 'ताली' ही अप्रतिम वेब मालिका जिओ सिनेमावर पाहिली. 'बस बाई बस' या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गौरी यांच्याशी मला संवाद साधण्याचा फार छान योग आला होता. क्षितीज पटवर्धन मित्रा त्यांचं संपूर्ण आयुष्य तू ज्या पद्धतीने तुझ्या लेखणीतून उतरवलं आहेस, त्याला तोड नाही. खूप खूप कौतुक तुझे..."

पुढे सुबोध भावेने सिरिजमध्ये काम केलेल्या मराठी कलाकारांबद्दलदेखील पोस्टमध्ये उल्लेख करत कौतुक केलं आहे. तो म्हणाला की, "हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, नंदू माधव, शितल काळे तुम्ही तुमच्या भूमिका इतक्या सुंदर साकारल्या आहेत. कार्तिक निशाणदार, अर्जुन बरन मित्रांनो अशी निर्मिती करण्यासाठी धाडस लागते. अप्रतिम! जिओ सिनेमाचे मनापासून धन्यवाद, ही मालिका सादर केल्याबद्दल. रवी जाधव देवा, तुझ्या प्रत्येक कलाकृती मध्ये तुझा खास असा ठसा असतो. या कलाकृतींमध्ये तो कायमचा आमच्या मनावर कोरला गेलाय. प्रेम. कृतिका देव गणेश- गौरी ही व्यक्तिरेखा उभी रहाण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे" या पोस्टमध्ये त्याने सुश्मिता सेनच्या अभिनयाचं देखील कौतुक करत लिहिलं की, "सुश्मिता सेन तुम्ही त्या झाला होता. बस इतकेच... श्री गौरी सावंत तुम्हाला मनापासून वंदन" सुबोधन केलेल्या या पोस्टची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in