सुनील शेट्टीने #boycottBollywood ट्रेंड बंद करण्यासाठी योगींकडे केली मागणी

सुनील शेट्टीने #boycottBollywood ट्रेंड बंद करण्यासाठी योगींकडे केली मागणी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मुंबईत कलाकारांची भेट घेतल्यानंतर केली त्यांच्याशी चर्चा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बॉलिवूड कलाकारांची भेट घेऊन त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा केली. अशामध्ये अनेक कलाकारांनी बॉलिवूडची कैफियत त्यांच्यासमोर मांडली. अभिनेता सुनील शेट्टीने (Suniel Shetty) बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या बॉयकॉट ट्रेंड (#boycottBollywood) बंद करण्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी केली. यावेळी सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या ड्रग्स प्रकरणाबद्दलही भाष्य केले.

सुनील शेट्टी म्हणाला की, "बिलिवूडमध्ये अंदाजे ९० टक्के लोकं ड्रग्स घेत नाहीत. ते कठीण परिश्रम करून आपले काम लोकांपर्यंत पोहचवत असतात. यामुळे हे बॉयकॉट ट्रेंड बंद करण्यात यावे. जेणेकरून, यामुळेच बॉलिवूडची बिघडलेली प्रतिमा पुन्हा सुधारता येईल. बॉलिवूडवरून हा टॅग काढून टाकण्याची नितांत गरज आहे. टोपलीमध्ये एक सफरचंद खराब निघाले, म्हणजे सगळेच खराब असतात असे नाही. त्यामुळे बिलिवूडवर लागलेला हा कलंक तुम्हीच दूर करू शकता. कृपया, ही गोष्ट तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतही पोहचवावी." अशी विनंती त्याने केली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत झालेल्या या बैठकीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्याची आहे, यासाठी त्यांनी सर्व अभिनेत्यांची भेट घेतली. यावेळी जॅकी श्रॉफ, गायक कैलाश खैर, सोनू निगम तसेच जॅकी भगनानी यांच्यासह अनेक कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in