Sunny Deol Announces Border 2 : आज, १३ जून रोजी १९९७ रोजी सनी देओलचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट बॉर्डर रिलीज झाला होता. आता २७ वर्षांनंतर आज १३ जून रोजीच बॉर्डर २ च्या घोषणेचा व्हिडीओ अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्याने चित्रपटाशी संबंधित काही माहितीही शेअर केली आहे. सनी देओलने त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून चाहत्यांना ही खुशखबर देत एक व्हिडीओ शेअर केला आणि काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला.
१९९७ मध्ये रिलीज झालेला 'बॉर्डर' रिलीज होऊन आज २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. जेपी दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'बॉर्डर' या चित्रपटाला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. या ब्लॉकबस्टर चित्रपटात सनी देओल, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुनील शेट्टी, पूजा शेट्टी यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. या ब्लॉकबस्टर चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती. बऱ्याच दिवसांपासून त्याच्या सिक्वेलची चर्चा होती. आता या चित्रपटाला २७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सनी देओलने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्याने 'बॉर्डर २' च्या सिक्वेलची घोषणा केली आहे.
कोण करणार दिग्दर्शन?
पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये, सनी देओलने 'बॉर्डर २' हा भारतातील सर्वात मोठे युद्ध चित्रपट असल्याचे वर्णन केले आहे. यावेळेस भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता या चित्रपटाची निर्मिती करणार असून अनुराग सिंग दिग्दर्शित करणार आहेत.
चाहत्यांना झाला आनंद
हा व्हिडीओ पोस्ट होताच चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले- 'सुपर एक्साइटेड.' या चित्रपटाला अनेकांनी आताच ब्लॉकबस्टर घोषित केले आहे. एका यूजरने लिहिले- 'मी आता प्रतीक्षा करू शकत नाही.' दुसऱ्याने लिहिले- 'मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे, कारण माझे बालपण परत येत आहे.' याआधी गेल्या वर्षी सनी देओलचा 'गदर २' रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर सनी देओलने बॉर्डरचा सीक्वलही येऊ शकतो, असे संकेत दिले होते.