भाऊ बॉबीच्या वाढदिवसानिमित्त सनी-ईशा देओलची खास पोस्ट

अभिनेता बॉबी देओलचा आज वाढदिवस आहे. बॉबी देओल आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे.
भाऊ बॉबीच्या वाढदिवसानिमित्त सनी-ईशा देओलची खास पोस्ट

अभिनेता बॉबी देओलचा आज वाढदिवस आहे. बॉबी देओल आज आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम करत असलेल्या बॉबीच्या करिअरला अचानक ब्रेक लागला होता. मात्र गेल्या वर्षी बॉबीला त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळाले. 'ॲनिमल' या चित्रपटाद्वारे त्याला त्याच्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाला.

वाढदिवसानिमित्त बॉबीचा मोठा भाऊ आणि अभिनेता सनी देओलने त्याला शुभेच्छा दिल्या. सनीने शनिवारी इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले. त्यासोबत, "हॅप्पी बर्थडे माय लिल, लॉर्ड बॉबी", असे कॅप्शन दिले. तर, बॉबीनेही सनीच्या पोस्टला रिप्लाय करत लव यु भैय्या, यु आर माय एव्हरिथींग असा रिप्लाय दिला. ईशा देओल हिनेही इंस्टाग्रामला स्टोरी शेअर करत बॉबीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात, त्यात तिने बॉबीचा फोटो शेअर करत ''तुझा खूप अभिमान आहे'' असं म्हटलं आहे.

वाढदिवसाची पोस्ट अपलोड होताच चाहते आणि इंडस्ट्रीमधील सेलिब्रीटी बॉबीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्याने, "आपका परिवार मेरा पसंदीदा परिवार है", असे लिहिलेय. तर, "आप जैसा भाईयों का प्यार आजकल ज्यादा देखने को नही मिलता," असे अजून एकाने म्हटले आहे.

PM

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल' चित्रपटात बॉबीने अबरार हकची भूमिका साकारली होती. 'ॲनिमल'चे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले होते. 2023 मधील हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट होता. त्यानंतर बॉबीकडे बॉलिवूड, साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि ओटीटीचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. 'कांगुवा' या चित्रपटातून बॉबी तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय बॉबी सुपरस्टार नंदामुरी बालकृष्णाच्या' NBK109' या तेलुगु चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये बॉबी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in