सनी लिओन प्रथमच झळकणार कान्सच्या रेड कार्पेटवर

अनुराग कश्यप दिग्दर्शित 'केनेडी' चित्रपटाचं खास स्क्रिनिंग
सनी लिओन प्रथमच झळकणार कान्सच्या रेड कार्पेटवर

जगप्रसिद्ध कान्स फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर यावर्षी अभिनेत्रींमध्ये सनी लिओन प्रथमच झळकणार आहे . ती लवकरच तिच्या टीमसोबत प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या 'केनेडी' या चित्रपटाद्वारे पदार्पण करण्यासाठी उड्डाण करणार असल्याचं समजतंय. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासोबत तिचे हे पहिलं काम आहे.या मर्डर मेलडीचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि चाहत्यांना सनी लिओनीच्या अभिनयाचं आणि लूकचं कौतुक केलं. कान्स 2023 मध्ये मिडनाईट स्क्रीनिंगसाठी प्रतिष्ठित ज्युरींनी निवडलेला 'केनेडी' हा एकमेव भारतीय चित्रपट आहे.अनुराग कश्यप यांचं दिग्दर्शन असल्यामुळे जागतिक सिनेविश्वातही या सिनेमाकडे लोकांचं विशेष लक्ष आहे.

अनेक स्टाईल अवॉर्ड्स जिंकून, सनी लिओनीने खूप मोठा पल्ला गाठला आहे आणि बॉलीवूडमधील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख स्थापना केली आहे. तिच्या जबरदस्त लुक आणि अनोख्या व्यक्तिमत्त्वाने, सनी निश्चितपणे सगळ्यांची मन जिंकून आपल्या कामाची छाप पडणार आहे.

कान्सचं रेड कार्पेट आणि त्यावरील फॅशन आयकॉनची वेशभूषा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सनी लिओन यावेळी रेड कार्पेटवर काय परिधान करणार , तिचा लुक कसा असेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in