सुपरस्टार धनुष्य पोहचला असिस्टंटच्या लग्नाला ; सगळयांना बसला आश्चर्याचा धक्का

धनुषसारख्या मोठ्या स्टारला आपल्या लग्नात पाहिल्यानंतर असिस्टंट भावुक
सुपरस्टार धनुष्य पोहचला असिस्टंटच्या लग्नाला ; सगळयांना बसला आश्चर्याचा धक्का

साऊथचा सुपरस्टार धनुष्य कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. धनुषनं बॉलीवूडमध्ये ही काही चित्रपटांत केलं आहे. धनुष त्याच्या येणाऱ्या सिनेमामुळे सध्या चर्चेत आहे. आता तो पुन्हा त्याच्या दिलखुलास स्वभावामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सध्या धनुषचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे. ज्यात धनुषने रविवारी अचानक त्यांच्या असिस्टंटच्या लग्नाला हजेरी लावली आहे. धनुषला अचानक लग्न सोहळ्यात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. धनुषसारख्या मोठ्या स्टारला आपल्या लग्नात पाहिल्यानंतर त्याच्या असिस्टंट खुपच भावुक झाला होता. यावेळी धनुषच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं होते. त्याने खूप साधा लूक केला होता. तो शर्ट, जीन्स आणि कॅप घालून लग्नात उपस्थीत झाला होता.

धनुष्य त्याचा चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. पण त्याने वेळ काढून तो त्याच्या कर्मचाऱ्याच्या लग्नाला गेला आणि त्याने नवविवाहित जोडप्यासोबत फोटोही काढले. धनुषचे लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावेळी धनुषला पाहिल्यानंतर असिस्टंटला देखील रडू आवरले नाही.

धनुषच्या आगामी चित्रपटांचे नाव 'कॅप्टन मिलर' हे आहे. हा चित्रपट 15 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक देखील रिलीज झाला आहे. या चित्रपटासाठी चाहते खुप उत्सूक आहेत. धनुषसोबत या चित्रपटात प्रियंका अरुल मोहन, शिवा राजकुमार, निवेदिता सतीश आणि संदीप किशन हे मुख्य भूमिका साकारणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in