Sushant Singh Rajput Birth Anniversary : सुशांतच्या बहिणीसह रिया चक्रवर्तीलाही आली आठवण, वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत भलेही आज आपल्यात नसेल. मात्र चाहत्यांच्या मनात तो कायम जिवंत राहील.
Sushant Singh Rajput Birth Anniversary : सुशांतच्या बहिणीसह रिया चक्रवर्तीलाही आली आठवण, वाढदिवसानिमित्त शेअर केली खास पोस्ट

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत भलेही आज आपल्यात नसेल. मात्र चाहत्यांच्या मनात तो कायम जिवंत राहील. आज 21 जानेवारी रोजी सुशांतचा 38 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याचे चाहते आणि अन्य कलाकार सोशल मीडियाद्वारे सुशांतच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अशात, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आणि सुशांतच्या मृत्यूसाठी चाहत्यांनी जिला सर्वाधिक जबाबदार ठरवत तुफान ट्रोल केले होते त्या रिया चक्रवर्तीनेही आज एक खास पोस्ट केली. तसेच, सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्तीनेही भावासाठी एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.

रियाने इंस्टाग्राम स्टोरीजवर सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. पण, सुशांतच्या आठवणीत फोटोखाली रेड हार्ट इमोजी टाकला आहे. तर, सोन्यासारख्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. लव्ह यू फॉरएव्हर... मला आशा आहे की, तू लाखो हृदयात आहेस आणि त्यांना चांगले काम करण्यास आणि चांगले बनण्यास प्रेरणा देतोयेस. 3..2..1..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आमचा मार्गदर्शक तारा, तू नेहमी चमकत राहो आणि आम्हाला मार्ग दाखव, असे श्वेताने लिहिले आहे. त्यासोबत, सुशांतच्या आठवणींना उजाळा देणारा खास व्हिडिओही शेअर केला आहे.

'पवित्र रिश्ता'मधून लोकप्रियता मिळाली-

२००९ रोजी आलेल्या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांत घरोघरी लोकप्रिय झाला होता. सुशांतसह या शोमध्ये अंकिता लोखंडेही होती. यादरम्यान अंकिता आणि सुशांत खऱ्या आयुष्यातही रिलेशनशिपमध्ये होते. या शोमध्ये मानव आणि अर्चना यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मानवच्या भूमिकेसाठी सुशांतला तीन प्रमुख दूरचित्रवाणी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले, ज्यात सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता आणि सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्याचाही समावेश आहे. यानंतर सुशांतने २०१३ मध्ये रिलीज झालेल्या 'काई पो चे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'पीके', 'एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'केदारनाथ' आणि 'छिछोरे' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने जबरदस्त अभिनय केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in