अजून एक सुशांत सिंग राजपूत?; तुनिषा शर्मा आत्महत्येमागे सुशांतच्या बहिणीने व्यक्त केली शंका

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर पडद्यामागचे काळी बाजू पुन्हा एकदा सर्वांसमोर आली असून आता यावर सुशांतच्या बहिणीने शंका उपस्थित केली
अजून एक सुशांत सिंग राजपूत?; तुनिषा शर्मा आत्महत्येमागे सुशांतच्या बहिणीने व्यक्त केली शंका

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्यानंतर सिनेसृष्टीमध्ये एकच खळबळ माजली. तिने मालिकेचे शूटिंग सुरु असताना व्हॅनिटी व्हॅनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर तिचा सहकलाकार शिझान मोहम्मद खानला अटक करण्यात आली. त्यांचे प्रेमसंबंध असून तिने नैराश्यात हे पाऊल उचलले असल्याची माहिती देण्यात आली. तरीही, या प्रकरणाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यावरून आता सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीनेदेखील पोस्ट शेअर शंका उपस्थित केली.

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने ट्विट केले की, "मला वाटत नाही की ही आत्महत्या आहे. व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोण आत्महत्या करतं? आणखी एक सुशांत सिंग राजपूत? काय चालू आहे कळत नाही. ती फक्त २० वर्षांची होती" असे म्हणत तिने तुनिषाच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला. दरम्यान, पोलिसदेखील याप्रकरणात अनेक बाजूंचा विचार करत तपास करत आहेत. त्यामुळे आता या पोलीस तपासामध्ये काय समोर येते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in