प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) लग्नबंधनात अडकली आहे. तिने समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदशी लग्नगाठ बांधली. ६ जानेवारीला स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने कोर्ट मॅरेज पद्धतीने लग्न केले. नुकतेच तिने ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत लग्नाची बातमी दिली. तिने फहाद अहमदसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिने पहिल्या भेटीपासून ते लग्न करण्यापर्यंतच्या प्रवासाची एक झलक दाखवली आहे.
स्वराने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचा आपण काही वेळेस खूप शोध घेत असतो. आम्ही दोघेही प्रेम शोधात होतो, पण आम्हाला पहिल्यांदा मैत्री सापडली. त्यानंतर आम्ही एकमेकांना खऱ्या अर्थाने एकत्र आलो" स्वराने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. तिच्या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी दोघानांही शुभेच्छा दिल्या आहेत.
फहाद अहमद हा समाजवादी पक्षाचा नेता आहे. तसेच तो एक सामाजिक कार्यकर्ताही आहे. महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाशी त्याचे खास नाते आहे. त्याने टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे. २०२२च्या जुलै महिन्यात त्याने समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्याने अलीगढ मुस्लिम विद्यापीठमधून शिक्षण घेतले आहे. सीएएविरोधी आंदोलनात त्याने सहभाग दर्शवला होता.