अखेर २५ दिवसांनी घरी परतला 'तारक मेहता...' चा सोढी; दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

गुरुचरण २२ एप्रिल रोजी दिल्लीतून मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. परंतु, गुरुचरण दिल्ली विमानतळावर पोहोचला नाही आणि घरीही परतला नाही.
अखेर २५ दिवसांनी घरी परतला 'तारक मेहता...' चा सोढी; दिल्ली पोलिसांनी दिली माहिती
Published on

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेता गुरुचरण सिंग अखेर शुक्रवारी (१७ मे) घरी परतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. पोलिसांनी त्यांचा न्यायालयात जबाब देखील नोंदवलाय. गुरूचरणने चौकशीत, 'धार्मिक यात्रेला' जाण्यासाठी घर सोडले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

गुरुचरण २२ एप्रिल रोजी दिल्लीतून मुंबईला जाण्यासाठी निघाले होते. परंतु, दिल्ली विमानतळावर पोहोचले नाही आणि घरीही परतले नाही. गरुचरण अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांचे कुटुंबिय आणि सहकलाकार चिंतेत पडले होते.

गुरुचरण अचानक बेपत्ता झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला होता. अलीकडेच गुरुचरणचे वडील हरगीत सिंग यांनी, "आम्ही पोलिसांकडून गुरूचरणबाबत काही माहिती मिळण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. जे काही घडले ते आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे. या परिस्थितीला कसे सामोरे जावे हे आम्हाला समजत नाही", असे ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. माझा मुलगा लवकरच घरी परतेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती.

गरुचरण बेपत्ता झाल्यानंतर दिल्ली पोलिस त्यांच्याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर देखील गेले होते. त्याच्या कामाचा मोबदला मिळाला आहे की नाही? याबद्दल पोलिसांनी माहिती घेतली. परंतु, गरुचरणची सर्व थकीत रक्कम आधीच देण्यात आल्याचे पोलिसांना कळाले.

गरुचरण यांनी काही वर्षापूर्वीच तारक मेहता का उल्टा चष्मा शो सोडला आहे. त्यानंतर गरुचरण कोणत्याच शोचा भाग झाला नाही. गुरुचरण हे रोशन सिंग सोढीची भूमिका साकारत होते. या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप पसंत देखील केले होते.

logo
marathi.freepressjournal.in