सुपरस्टार रजनीकांतसोबत थिरकली तमन्ना भाटिया

'कावला' गाणं अल्पावधीत लोकप्रिय
सुपरस्टार रजनीकांतसोबत थिरकली तमन्ना भाटिया

सध्या बी टाऊन मध्ये चर्चा आहे अभिनेत्री तमन्ना भाटियाची ! तिच्या बॅक टू बॅक प्रोजेक्ट्स मुळे ती चर्चेत आहे. अलीकडेच तिच्या अ‍ॅमेझॉन प्राइमवरील जी करदा आणि नेटफ्लिक्सवरील 'लस्ट स्टोरीज 2' या हिंदी सिरीजमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

'जेलर' तमिळ चित्रपटातील " कावला " हे गाणं सध्या सगळीकडे व्हायरल झालं आहे. 6 जुलै रोजी या बहुचर्चित गाण्याची झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली. तमन्ना या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि दिग्दर्शक नेल्सन यांच हे गाणं लाँच झालं असून एका खास प्रोमो मधून हा व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कावलाच्या म्युझिक व्हिडिओमध्ये तमन्ना भाटियाने तिच्या अफलातून डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांना वेड लावलंय. जेलर मधल्या गाण्याच्या आकर्षक ट्यूनमध्ये प्रेक्षक गुंतले आहेत. 'कावला'मध्ये तिचं सौंदर्य अजून खुलले आहे.

'कावला'च्या रिलीजसह प्रेक्षकांचे अपार प्रेम तिला मिळत आहे. जेलर व्यतिरिक्त तिच्याकडे मल्याळममध्ये 'बांद्रा' आणि तेलुगुमध्ये 'भोला शंकर' हे चित्रपट असून तमिळमध्ये 'अरनामनाई 4' हा एक बिग बजेट चित्रपट ती करणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in