'तनु वेड्स मनू रिटर्न्स'ला झाली 8 वर्षे पूर्ण

आर. माधवन आणि कंगना रनौत यांच्या धमाल कॉमेडीला 8 वर्षे पूर्ण !
'तनु वेड्स मनू रिटर्न्स'ला झाली 8 वर्षे पूर्ण

"तनु वेड्स मनु रिटर्न्स" या चित्रपटाच्या रिलीजला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. आनंद एल. राय दिग्दर्शित आणि आर. माधवन आणि कंगना रणौत या धमाल जोडीमुळे हा चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं होतं.

"तनु वेड्स मनु रिटर्न्स" मध्ये आर. माधवनची प्रामाणिक आणि प्रेमळ मनूची भूमिका प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजली. त्यामुळे चित्रपटात अधिक प्रमाणिकतेची भर पडली आणि कंगना राणौतने तनु आणि दत्तोच्या दुहेरी भूमिकांमध्ये चमकदार कामगिरी केली.

चित्रपटाचे यश आणि त्याचा परिणाम यावर विचार करताना, आर. माधवन यांनी शेअर केले, "'तनु वेड्स मनू रिटर्न्स' रिलीज होऊन आठ वर्षे झाली आहेत. या चित्रपटाला माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे, आणि आजही या चित्रपटाला मिळत असलेले प्रेम आणि पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आहे. हा प्रवास इतका संस्मरणीय बनवल्याबद्दल मी चित्रपटामागील टीम आणि प्रेक्षकांचा आभारी आहे."

आनंद एल राय सांगतात, "तनु वेड्स मनूचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला आणि व्वा तनु वेड्स मनूच्या रिटर्नला आठ वर्षे पूर्ण झाली.हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा अनुभव खूप मजेदार होता. काम करण्यासाठी माझ्या आवडत्या प्रकल्पांपैकी हा एक आहे. तसेच मला माधवन आणि कंगनाच्या टॅलेंटचा उत्तम वापर करण्याची परवानगी दिली. मला खूप आनंद आहे की आजच्या काळात हा चित्रपट अजून ही प्रेक्षकांच्या मना वर अधिराज्य गाजवत आहे."

या चित्रपटाने केवळ कथाकथनातच उत्कृष्ट कामगिरी केली नाही तर त्यात अनेक मातब्बर कलाकारदेखील होते. दीपक डोबरियाल, स्वरा भास्कर, मोहम्मद झीशान अय्युब आणि जिमी शेरगिल यांसारख्या कलाकारांनी उत्तम कामगिरी केली.

"तनु वेड्स मनु रिटर्न्स" हा भारतीय चित्रपटसृष्टीतील क्लासिक सिनेमा म्हणून साजरा केला जातो. त्याचे संस्मरणीय संवाद, संगीत आणि अविस्मरणीय पात्रे यांनी जगभरातील चित्रपट रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी आहेत. आनंद एल राय यांच्याकडे 'फिर आयी हसीन दिलरुबा' सोबत 'झिम्मा 2' पाइपलाइनमध्ये आहे आणि प्रेक्षक आगामी प्रोजेक्ट्सचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in