टांझानियामध्येही 'बहरला हा मधुमास'....

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटातील लोकप्रिय गाण्यावर थिरकले टांझानियातील किली पॉल आणि त्याची बहीण
टांझानियामध्येही 'बहरला हा मधुमास'....

केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. आजोबांच्या म्हणजेच शाहीर साबळे यांच्या १०० व्या जन्मशताब्दी निमित्त त्यांचा नातू केदार शिंदे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.या चित्रपटाचा ट्रेलर, गाणी हे सर्वच हिट ठरताना दिसत आहेत. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं सध्या विशेष ट्रेंड होत आहे.

'बहरला हा मधुमास’ हे गाणं सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय झालं आणि पाहता पाहता या गाण्यावर सामान्य लोकांसह अनेक अभिनेत्रींनीं ताल धरला.

हा ट्रेंड आता भारताबाहेरदेखील जाऊन पोहोचला आहे. टान्झानिया मधील लोकप्रिय रील स्टार किली पॉल आणि त्याची बहीण निमा पॉल यांनी देखील या गाण्यावर रील केली आहे. अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांनी ही रील शेअर केली आहे.या व्हिडीओत किली पॉल आणि त्याची बहिण हुबेहुब हुकस्टेप करत आहेत. निमा पॉल हिने अभिनेत्री सना शिंदे हिच्याप्रमाणे गाण्यातील हुकस्टेप कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. ती या गाण्याचे लिपसिंकही करताना दिसत आहे.

किली पॉल आणि निमा पॉल यांनी अनेक बॉलीवूड गाण्यांवर या आधी ताल धरला आहे. मराठी गाण्यावर या दोघांना विडिओ करताना पाहून अनेक मराठी कलाकार खुश झाले असून त्यांनी त्यांची पसंती इंस्टाग्राम वर दर्शवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in