Tejas Review: कंगणा रानौतचा 'तेजस' देशभरात रिलीज ; अनेकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

या चित्रपटांत कंगनाने एअर फोर्स अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
Tejas Review: कंगणा रानौतचा 'तेजस' देशभरात रिलीज ; अनेकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौतचा 'तेजस' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट संपूर्ण देशभरात रिलिज झाला आहे. या चित्रपटांत कंगनाने एअर फोर्स अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तेजसचा टिझर आला होता. तेव्हा पासून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागली होती. आज अखेर हा चित्रपट रिलिज झाला आहे. प्रेक्षकांनी 'तेजस' या चित्रपटांवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका यूजरनं लिहलं आहे की, 'तेजस' हा चित्रपट मास्टरपीस आहे. चित्रपटातील VFX खूप चांगले आहेत. कंगनाने परत एकदा नव्या चित्रपटातून देशभक्तीची भावना जागृत केली आहे. 'तेजस' हा चित्रपट #मणिकर्णिका #क्वीन #TanuWedsManuReturnsच्या यशाची पुनरावृत्ती करू शकतो. अवश्य पहा चित्रपट !!!"

दुसऱ्या यूजरने लिहलं आहे की, 'तेजस' रिव्हू: मस्त कामं केलंय कंगन रानौतने तिचा अभिनय शक्तीशाली आणि मार्मिक आहे. चित्रपटाची कथा प्रेरणादायी आणि देशभक्तीपूर्ण अशी आहे. स्किट अजून खिळवून ठेवणारी हवी होती पण कंगनासाठी हा चित्रपट जाऊन नक्की बघा.

याशिवाय आणखी एका युजरने लिहीलं आहे की, "रेटिंग : ५ स्टार निकाल : भारतीय वायुसेनेला चित्तथरारक, प्रेरणादायी, समर्पक श्रद्धांजली.! जर तुम्हाला तुमच्या देशावर प्रेम असेल तर हा चित्रपट कोणी चुकवू नका. आवर्जून पहा चित्रपट..! कंगना ही तिच्या काळातील एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि पुन्हा एकदा तिच्या जबरदस्त अभिनयाने सारखी गर्जना करत आहे. तांत्रिक बाजू, चित्रीकरण, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग आणि फॉरमॅट हा चित्रपट खुसखुशीत आणि स्पष्ट आहे.! 𝗔𝘄𝗮𝗿𝗱 विजेता चित्रपट आहे.

दरम्यान, कंगनाचा 'तेजस' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती मजल मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in