थलायवाचा 'जेलर' बॉक्स ऑफिसवर सुसाट ; चार दिवसांच्या कमाईचे आकडे आले समोर

'जेलर' या चित्रपटाची कमाई बघितली तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवला आहे.
थलायवाचा 'जेलर' बॉक्स ऑफिसवर सुसाट ; चार दिवसांच्या कमाईचे आकडे आले समोर
Published on

सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित असा चित्रपट 'जेलर' गुरुवारी प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. 'जेलर' या चित्रपटाची कमाई बघितली तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड बनवला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५० कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली. आता या चित्रपटाच्या चौथ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

'सॅकनिक'च्या रीपोर्टनुसार 'जेलर'ने पहिल्याच दिवशी तब्बल ५२ कोटी रुपयांची कमाई केली होती. यामध्ये तामिळनाडूमध्ये २३ कोटी, कर्नाटकमध्ये ११ कोटी, केरळमध्ये ५ कोटी, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून १० कोटी आणि इतर राज्यांतील ३ कोटी रुपयांचा समावेश आहे. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २७ कोटींची कमाई केली असून . तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने ३४.३ कोटी रुपयांचा गल्ला जमावाला आहे

चौथ्या दिवशी या चित्रपटाने ३८ कोटीचा गल्ला जमवला आहे. फक्त चार दिवसांत या चित्रपटाने भारतामध्ये तब्बल ३०० कोंटीचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आत्तापर्यंत तब्बल ५ विक्रम मोडले आहेत. चित्रपटाची ही कमाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात तब्बल ९०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवला गेला आहे. या चित्रपटात राम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन, योगी बाबू हे कलाकार देखील मुख्य भूमिकेमध्ये आहेत. तसंच या चित्रपटात जॅकी श्रॉफ आणि मोहनलाल यांनी सुद्धा छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

logo
marathi.freepressjournal.in