''दिल्ली पोलिसांचे मनापासून आभार... '' आरोपीच्या अटकेनंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रतिक्रिया

मुख्य आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. या अटकेवर अभिनेत्रीने रश्मिका मंदाना हिने सोशल मीडियाद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
''दिल्ली पोलिसांचे मनापासून आभार... '' आरोपीच्या अटकेनंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाची प्रतिक्रिया

अभिनेत्री रश्मिका मंदानाचा नोव्हेंबर 2023 या महिन्यात डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक मुलगी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. त्या मुलीचा चेहरा हुबेहुब रश्मिकासारखा दिसत होता. या प्रकरणी दिल्ली पोलीसांनी डीपफेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या मुख्य आरोपीला आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. पोलिसांनी याआधी बिहारमधील एका १९ वर्षीय तरुणाची चौकशी केली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. या अटकेवर अभिनेत्रीने रश्मिका मंदाना हिने सोशल मीडियाद्वारे पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिल्ली पोलिसांचे आभार मानले आहे. रश्मिका म्हणाली, “या प्रकरणातील आरोपीला पकडल्याबद्दल दिल्ली पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त करते. तसेच त्या लोकांचे देखील आभार, जे या परिस्थितीत माझ्या बरोबर ढाल बनून उभे होते.”

पुढे रश्मिका म्हणाली, “सर्व मुलं आणि मुली, तुमचे फोटो तुमच्या संमतीशिवाय वापरले किंवा मॉर्फ केले असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे. पण तुमच्या आजूबाजूला तुमचा पाठिंबा देणारे लोक आहेत; जे तुम्हाला कारवाई करण्यासाठी मदत करतील, हे लक्षात ठेवा.”

रश्मिका मंदानानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा देखील डीपफेक व्हिडीओ समोर आला होता.  कतरीना कैफ, आलिया भट्ट, त्यानंतर नोरा फतेही या डिपफेकची शिकार झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in