"मैं कौन हूँ..." म्हणत बहुचर्चित 'जवान'चा प्रीव्यू आऊट; 'या' तारखेला येणार जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला

या सिनेमात शाहरुख हा वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे
"मैं कौन हूँ..." म्हणत बहुचर्चित 'जवान'चा प्रीव्यू आऊट; 'या' तारखेला येणार जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा त्यांच्या आगामी 'जवान' चित्रपटासाठी चर्चेत आहे. त्यांच्या या बहुचर्चित अश्या सिनेमाचा अॅक्शनपॅक्ड प्रीव्यू आऊट झाला आहे. सध्या हा प्रीव्यू सोशस मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातलाना दिसून येत आहे.

शाहरुखच्या आगामी 'जवान' या एक अॅक्शनपट असून या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा चांगलाच तडका पाहायला मिळणार आहे. हा प्रीव्यू बघून सिनेमाचा अंदाज येत आहे. शाहरुखच्या दमदार आवाजाने या प्रीव्यूची सुरुवात होताना दिसत आहे. या तो, "मैं कौन हूँ, कौन नहीं, पता नहीं, ना तो कोई इरादा हूं. पुण्य हूँ या पाप हूँ ये खुद से पूछना क्योंकि मैं भी आप हूँ... रेडी... नाम तो सुना होगा", असं म्हणत आहे.

'जवान' सिनेमाच्या या प्रीव्यूमध्ये विजय सेतुपती, नयनतारा आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण यांचा अॅक्शन मोड पाहायला मिळत आहे. या सिनेमात दीपिका ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बादशाहा शाहरुख खान वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान याने स्व:ता हा प्रीव्यू शेअर केला आहे. 'जवान' सिनेमा ७ सप्टेंबर रोजी हिंदी, तामिळ, आणि तेलगू भाषेत जगभर प्रदर्शित होणार आहे."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in