केदारनाथमधील हे भीषण वास्तव अभिनेत्रीने आणले समोर ; व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

अभिनेत्रीने अशा महत्वाच्या विषयावर लक्ष वेधल्याने तिच सर्वत्र कौतूक होत आहे
केदारनाथमधील हे भीषण वास्तव अभिनेत्रीने आणले समोर ; व्हिडिओ शेअर करत म्हणाली...
Published on

'केदारनाथ' हे उत्तराखंडमधील तब्बल ३ हजार ५३८ मीटर उंचीवर वसलेले महादेवाचं मंदिर आहे. गौरीकुंड ते केदारनाथ धाम पर्यंतचा प्रवास करण्यासाठी ५ ते ६ तासांपर्यंतचा वेळ लागतो. या प्रवास पायी करणे शक्य नसल्याने या ठिकाणी घोडा किंवा खेचरवरून जावं लागतं. पण माणसांचं येवढ वजन घेऊन १६ ते १७ किमी प्रवास प्राण्यांना देखील असहाय्य होतो. त्यामुळे या प्रवासादरम्यान अनेक प्राणी दगावतात. याबाबतचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री करिश्ना तन्नाने या प्रकरणी लक्ष घालून केदारनाथ जाणाऱ्या यात्रेकरून आवाहन करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

करिश्मा तन्नाने शेअर केलेल्या व्हिडिओत ती म्हणते की, "प्राणी जेव्हा स्व:ताच्या पाठीवर बसवून तुम्हाला तिर्थयात्रेला घेऊन जातात तेव्हा त्यांना त्रास होतो. कधीकधी हे घोडे व्याकूळ होऊन किंचाळतात. तुम्हाला या प्राण्याचा आवाज तुम्हाला एकू येत नाही का? केदारनाथचं दर्शन घेत असताना कोणा दुसऱ्याचा जीव जात असल्याचं तु्म्हाला दिसत नाही का? मुक्या जीवांचा त्यांच्या जन्मापासून मृ्त्यूपर्यंत वापर केला जातो, हे पाहून तुम्ही गप्प कसे राहता? चारधाम यात्रेदरम्यान ज्या घोड्याचा जीव जातो त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त लाचार आहात"

या व्हिडिओत ती पुढे म्हणते की, तुम्ही पाप करुन परत येत आहात. आता तरी जागे व्हा! आणि स्व:च्या पायाने जाऊन देवदर्शन करा. प्राण्याच्या वेदना जवळून जाणून घ्या. असं ती म्हणाली आहे. तसंच तिने मी पुष्कर सिंह धामला आवाहन करते की, आमच्या पवित्र देवभूमीला मृत घोड्यांचे स्मशान होण्यापासून वाचवा. असं ती म्हणाली आहे. अभिनेत्रीने अशा महत्वाच्या विषयावर लक्ष वेधल्याने तिच सर्वत्र कौतूक होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in