चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक आणि मेकर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन ने एक नवीन आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून हा निर्णय घ्यावा अशी इच्छा काही दिग्दर्शक आणि मेकर्सची होती. आता त्याच्या या इच्छेवर शिक्कामोर्तब झाल्याच सांगण्यात येतं आहे. सीबीएफसीच्या या निर्णयाचं सगळ्या दिग्दर्शकानी स्वागतं केलं आहे. तसंच बोर्डानं हिंदी भाषेत चित्रपट करणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शकांना मोठा दिलासा दिला आहे.
बोर्डानं सांगितल्याप्रमाणे जिथं हिंदी चित्रपटांची निर्मिती केली जाते तिथेच त्या चित्रपटांचं परिक्षण केलं जाईल आणि त्यांना सर्टिफिकेट देण्यात येईल.असं म्हटलं आहे. बोर्डाच्या वतीनं जी अधिसुचना करण्यात आली आहे त्यातं म्हटलं आहे की, यापुढील काळात निर्मात्यांनी त्यांच राज्यातून आपल्या चित्रपटाचे प्रमाणपत्र घ्यावे ज्या राज्यात त्या चित्रपटाचे चित्रिकरण झाले आहे. याबद्दलचे सविस्तर वृत्त अमर उजालानं दिलं आहे.
जर कोणत्या निर्मात्यानं तमिळ चित्रपटाच हिंदी डबिंग केलं ,तर त्याला प्रमाणपत्र घेण्यासाठी त्याच राज्यातील क्षेत्रीय सीबीएफसी कार्यालयामध्ये जाऊन ते सर्टिफिकेट घ्यावे लागेल. असं सांगितलं आहे व त्याबद्दल बोर्डानं १८ ऑक्टोबर २०२३ रोजी एक अधिसुचना प्रसिद्ध केली आहे. त्यात २०१७ च्या आदेशाची दुरुस्ती करण्यात आली आहे.