गर्भवती मॉडेल मलेसा मेरी मूनीची निघृण हत्या; रेफ्रिजरेटरमध्ये आढळला मृतदेह...

निधनानंतर तिची बहीण जॉर्डिन पॉलीन हिन मलेसा दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं उघड केलं आहे.
गर्भवती मॉडेल मलेसा मेरी मूनीची निघृण हत्या; रेफ्रिजरेटरमध्ये आढळला मृतदेह...

मनोरंजनसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गर्भवती लॉस एंजेलिस मॉडेल मलेसा मेरी मूनीची रहस्यमयी आणि निघृण हत्या झाली आहे. या घटनेनं सगळीकडे खळबळ उडाली आहे. मलेसा ही तिच्या राहत्या घरी रेफ्रिजरेटरमध्ये बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळुन आली आहे आणि सगळ्यात मोठी धक्कादायक गोस्ट म्हणजे, ती दोन महिन्यांची गर्भवती होती.

मलेस ही 31 वर्षांची होती. मलेस या मॉडेलचा मृतदेह तिच्या डाउनटाउन लॉस एंजेलिस अपार्टमेंटमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये आढळून आला. सप्टेंबर महिन्यातं तिच्या आईनं तपासणीची विनंती केल्यानंतर अधिकारी मलेसाच्या अपार्टमेंटला भेट देण्यासाठी गेले. तेव्हा या गोष्टचा पडदा उघडकीस आला. या हत्येप्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मलेसच्या निधनानंतर तिची बहीण जॉर्डिन पॉलीन हिन मलेसा दोन महिन्यांची गर्भवती असल्याचं उघड केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस जेव्हा तिथं गेले तपास घेण्यासाठी तेव्हा त्यांना मलेसाचे संपूर्ण शरीर रक्तान माखलेलं दिसलं, तोंड बंद होते, हात-पाय बांधलेले होते. या सगळ्यांवरून मलेसाची निर्घृण हत्या झाल्याचं स्पष्ट होतं आहे. मात्र, आरोपी कोण आहे याबद्दल अजूनही कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस तिच्या सोशल मीडियावरून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय मलेसाचे कोणा-कोणाशी संबंध होते, याचाही तपास पोलीस करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in