लग्नमंडपात नवरीच्या मागे लागला कुत्रा, घागरा घातलेल्या नवरीला पळता येईना!

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, या व्हिडीओत नवरी पुढे आणि कुत्रा तिच्या मागे मागे पळत होता.
लग्नमंडपात नवरीच्या मागे लागला कुत्रा, घागरा घातलेल्या नवरीला पळता येईना!

सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओंचे आपल्याला पोट धरून हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असाच एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.या व्हिडीओत लग्नमंडपात नवरीच्या मागे एक कुत्रा लागला होता. नवरी पुढे पळताच, कुत्रा तिच्या मागे मागे पळत होता. नवरीने घागरा घातलेला असल्याने तीला पळता येत नव्हतं, मंडपातील पाहुण्यांनी नवरीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्या जवळ जाण्याची हिम्मत कोणाची होत नव्हती. मंडपात पुजेचं सामान ठेवलेलं होतं, जिथे दोघे पळत होते.

पुजेसाठी ठेवलेलं कलश आणि कुरमुऱ्यांचे ताट मंडपात सगळीकडे विखुरलेले होते. नवरीला कुत्र्यापासून दूर करण्यासाठी लोक धावपळ करत होतं, परंतु कुत्रा काही थांबता नव्हता. शेवटी, नवरदेव पुढे येतो आणि आपल्या पत्नीला कुत्र्यापासून वाचवतो. त्यानंतर, कुत्रा तेथून निघून जातो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in