अमेरिकन गायिका आणि गीतकार बॅलेटा रेक्साच्या बाबतीत एक विचित्र घटना घडली आहे. रविवारी एका लाईव्ह शो दरम्यान रेक्सासोबत एक वेगळा अपघात घडला आहे. न्यूयॉर्कमध्ये एका कॉन्सर्ट दरम्यान रेक्सावर चाहत्याने मोबाईल फेकला आहे. यात ती जखमी झाली असून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
रेक्सा सध्या उत्तर अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. ती पिअर १७ येथील रुफटॉप स्टेजवर परफॉर्म करत असताना अचानक एका चाहत्याने तिच्यावर मोबाईल फेकल्याने ती जखमी झाली. या घटनेत रेक्साच्या चेहऱ्यावर तीन टाके पडले आहेत. या घटनेत ती जखमी झाल्याने तिला कॉन्सर्ट अर्धवट सोडावी लागली. या कॉन्सर्टनंतर भेट आणइ अभिवादन सक्ष आयोजित केले जाणार होते, परुंतु देखील या घटनेमुळे रद्द करण्यात आलं.
गायीकेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षकांमधून कोणीतरी तिच्या दिशेने फोन फेकला, ज्यात ती जखमी होऊन तिच्या चेहऱ्यावर तीन टाके पडले. रेक्साच्या चाहत्यांनी हा घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून ट्विटरवर हल्लेखोराला फटकारले आहे. "लोक असे का वागतात? त्यांना घरी योग्य शिकवण मिळत नाही का? " असा सुर या घटनेमुळे उमटू लागला आहे.
या घटनेच्या रेक्साच्या भविष्यातील दौऱ्यावर काय परिणाम होईल याबाबत गायीकेच्या टीमने सांगितलेले नाही. तसंच दौऱ्याच्या वेळापत्रकातही कोणताही बदल झालेला नाही.