'तान्हाजी, द अनसंग वॉरियर' चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड

तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या गाथेवर आधारित हा चित्रपट आहे.
'तान्हाजी, द अनसंग वॉरियर' चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड
Published on

नुकताच ६८वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात 'तान्हाजी, द अनसंग वॉरियर' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तान्हाजी चित्रपटाला लोकप्रिय हिंदी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच या चित्रपटातील नायकाची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अजय देवगण सोबत साऊथ अभिनेता सुर्याने 'सूरराई पोटरु' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता असा विभागून पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच सुर्याच्या 'सूरराई पोटरु' या चित्रपटासाठी ऑल टाइम एन्टरटेनिंग फिल्म अवॉर्डही जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार तुलसीदास ज्युनियर यांना देण्यात आला आहे.

कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसमवेत स्वराज्यासाठी लढलेल्या आणि जीव धोक्यात घालणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित 'तान्हाजी - द अनसंग वॉरियर' या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या गाथेवर आधारित हा चित्रपट आहे. तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सूरराई पोटरु या चित्रपटात एका सामान्य माणसाची कथा दाखवण्यात आली आहे. हा माणूस आपल्या कुटुंबाच्या, मित्रांच्या आणि जिद्दीच्या जोरावर जगातील सर्वात मोठा उद्योग करतो. हा तमिळ चित्रपट ब्लॉक ब्लास्टर हिट ठरला. एवढेच नाही तर हॉलिवूडमधील गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या श्रेणीत त्याचा समावेश करण्यात आला होता. या चित्रपटाची कथा कॅप्टन गोपीनाथ यांच्या चरित्रावर आधारित आहे.

तुलसीदास ज्युनियर हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. यात एका 13 वर्षाच्या मुलाची कहाणी आहे. स्नूकरच्या खेळात मुलगा आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला कसा घेतो हे दाखवले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मृदुल दत्ता यांनी केले आहे. यात संजय दत्त, राजीव कपूर आणि वरुण बुद्धदेव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सर्वोत्कृष्ट अभिनेता - अजय देवगण (तान्हाजी), सूर्या (सूरराय पोटरु) सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - तुलसीदास (आशुतोष गोवारीकर) सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - तान्हाजी - द अनसंग हिरो सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - सूरराई पोटरु (तमिळ) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - अपर्णा बालमुरली (सूरराई पोत्रू) सर्वोत्कृष्ट गीतकार - मनोज मुन्तशिर (सायना) सर्वोत्कृष्ट सिनेमा - द लाँगेस्ट किस - (किश्वर देसाई) सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - विशाल भारद्वाज (१२३२ किमी)

logo
marathi.freepressjournal.in