‘द क्रू’चे पहिले पोस्टर झाले रिलिज; करीना, क्रिती आणि तब्बू एअर होस्टेसच्या भूमिकेत

अभिनेत्री करीना कपूर खान,क्रिती सेनॉन आणि तब्बू सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा 'द क्रू'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘द क्रू’चे पहिले पोस्टर झाले रिलिज; करीना, क्रिती आणि तब्बू एअर होस्टेसच्या भूमिकेत

अभिनेत्री करीना कपूर खान,क्रिती सेनॉन आणि तब्बू सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. लवकरच त्यांचा 'द क्रू'हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.प्रेक्षकांकडून या टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला. नुकताच या चित्रपटातील करीना,क्रिती आणि तब्बू यांचा लूक समोर आला आहे.

'द क्रू' मधील अभिनेत्रींचा लूक-

या चित्रपटात करीना,क्रिती व तब्बू एअर होस्टेसच्या भूमिकेत दिसणार आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या लूकमध्ये या तिघी क्रिती लाल रंगाच्या एअर हॉस्टेसच्या पोषाखात दिसत आहेत. करीनाने तिच्या आणि तब्बू आणि क्रितीच्या लूकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. करीनाने "चेक-इनसाठी तयार आहात? क्रूसोबत उड्डाण करण्याची वेळ झाली आहे",असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.

या दिवशी होणार रिलीज-

‘द क्रू’ चित्रपट येत्या २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. राजेश ए कृष्णन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर व एकता कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिर्ती केली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला होता.या टीझरच्या बॅकग्राउंडला, 'चोली के पीचे क्या है' हे सुपरहिट गाणे ऐकू येतं होते. या चित्रपटाचा टीझर शेअर करत करीनाने 'तुमचा सीटबेल्ट बांधा, तुमचा पॉपकॉर्न तयार ठेवा ' असे कॅप्शन लिहिलं होते. या चित्रपटात प्रेक्षकांना तीन एअर होस्टेसची कथा पाहायला मिळणार आहे. तसेच सिनेमात करीना, क्रिती व तब्बू व्यतरिक्त दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांकडून या टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला. नुकताच या चित्रपटातील करीना,क्रिती आणि तब्बू यांचा लूक समोर आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in