'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मानं आषाढी एकादशी निमित्त गायलं गाणं, व्हिडिओ व्हायरल

अदा ही 'पोस्टर गर्ल' या सिनेमातील 'रखुमाई रखुमाई' हे गाणं गाताना दिसत आहे
'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्मानं आषाढी एकादशी निमित्त गायलं गाणं, व्हिडिओ व्हायरल

'द केरळ स्टोरी' या चित्रपटातून प्रकाशात आलेली अभिनेत्री अदा शर्मा ही सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. 'द केरळ स्टोरी' या सिनेमात केलेल्या अभिनयावरुन अदा शर्माचं सर्वत्र कौतूक केलं गेलं. तिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतं असून सोशल मीडियावर धुमाकुळ घालताना दिसून येत आहे. या व्हिडिओत अदा ही 'पोस्टर गर्ल' या सिनेमातील 'रखुमाई रखुमाई' हे गाणं गाताना दिसत आहे.

आज (२९ जून) आषाढी एकादशीच्या निमित्ताने अदा शर्मानं एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अदा 'पोस्टर गर्ल' सिनेमातील 'रखुमाई रखुमाई' हे गाणं गात आहे. तिने या व्हिडिओला "आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा" "विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा" असं कॅप्शन दिलं आहे.

अदा शर्मच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने या व्हिडिओवर 'अदा शर्मांना मराठी भाषेविषयी खूप अभिमान आहे. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने "एकच हृदय आहे, कितीवेळा जिंकणार आहात?" अशी भन्नाट कमेंट केली आहे. अदा शर्मा ही सोशल मीडिवार सक्रिय असून इन्स्टाग्रामवर तिला ८.५ मिलियन फॉलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकांचं लक्ष वेधून घेतात. अदानं नुकताच नऊवारी, नथ आणि सोनेरी रंगाची ज्वेलरी अशा मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याला देखील नेटकऱ्यांची चांगली पसंती पडली होती.

विक्रम भट्टच्या १९२० या २००८ साली रिलीज झालेल्या हॉरर चित्रपटामधून अदा शर्मानं बॉलिवूडमध्ये पदार्पन केलं होतं. यानंतर तिने कमांडो २, कमांडो ३ आणि बायबास रोडसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने अदाला विशेष ओळख मिळवून दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in