लोकप्रिय मालिका 'अनुपमा' मधील या प्रमुख कलाकाराचे अकाली निधन

शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम'मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती
लोकप्रिय मालिका 'अनुपमा' मधील या प्रमुख कलाकाराचे अकाली निधन

हिंदी सिनेसृष्टी आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते नितेश पांडे यांचे निधन झाले आहे. 'अनुपमा' या मालिकेत रुपाली गांगुलीच्या मैत्रिणीच्या पतीची भूमिका साकारणाऱ्या नितेश पांडे यांनी 23 मे रोजी अखेरचा श्वास घेतला. नितेश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त आहे.

नितेश पांडे यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक वर्षे चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम'मध्येही त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांनी शाहरुखच्या असिस्टंटची भूमिका साकारली होती. दिशा परमार आणि नकुल मेहता यांच्या 'प्यार का दर्द है मीठा प्यारा प्यार' या लोकप्रिय मालिकेतही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले  होते.

नितेशने 1995 मध्ये सिनेसृष्टीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने 'तेजस', 'सया', 'मंजिलें अपनी अपनी', 'जस्तजू', 'हम लड़कियाँ', 'सुनैना', 'कुछ तो लोग कहेंगे',' या सिनेमांमध्ये काम केले. 'एक रिश्ता साझेदारी का', 'महाराजा की जय हो', 'हिरो-गायब मोड ऑन ' या मालिकांमध्ये काम केले. तसेच, सध्या 'अनुपमा' या मालिकेत धीरज कपूरच्या भूमिकेत दिसत होते. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in