राजकीय आखाडा रंगणार

नाट्य संमेलन हा राजकीय आखाडा असतो, असं ज्येष्ठ रंगकर्मी म्हणताना दिसलेत. कारण प्रत्येक नाट्य संमेलनात हेच बहुतांशी तसेच चित्र दिसत आले आहे
राजकीय आखाडा रंगणार
PM

संजय कुळकर्णी /मुंबई : १००व्या नाट्य संमेलनास आता मोजून एक दिवसच शिल्लक आहे. पुण्यात गुरुवारी औपचारिक सोहळा होऊन खरे संमेलन ६ तारखेला चिंचवडला होणार आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावर असणार आहेत. त्यामुळे ते दोघे दिग्गज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. हे व्यासपीठ वेगळे असल्यामुळे त्यांच्या भाषणात ते राजकीय सूर नसतील. शरद पवार यशवंत नाट्य संकुलाचे विश्वस्त आणि अजित पवार अर्थमंत्री असल्यामुळे संकुलास भरीव देणगी अपेक्षित आहे. काका पुतण्याचे ते आधीच ठरलेलं असेल.

नाट्य संमेलन हा राजकीय आखाडा असतो, असं ज्येष्ठ रंगकर्मी म्हणताना दिसलेत. कारण प्रत्येक नाट्य संमेलनात हेच बहुतांशी तसेच चित्र दिसत आले आहे. आता १००व्या नाट्य संमेलनासाठी आठ राजकीय व्यक्तिमत्त्व येणार आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शरद पवार ही राजकीय नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. आदानप्रदान कोणत्या गोष्टींची होतेय ये फार महत्त्वाचे आहे. नाट्य संकुलाला निधीची खरंच आवश्यकता आहे. अनेक प्रोजेक्ट्स त्यांना करायचे आहेत. १००वे नाट्यसंमेलन असल्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी संमेलनास येण्याअगोदर निश्चितच त्याबाबतीत सखोल चर्चाही केली असेल. त्याची घोषणा फक्त कोण करतेय, त्याबद्दलची उत्सुकता जशी मला आहे तशीच सर्व नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना आणि रंगकर्मींनासुद्धा आहे. प्रशांत दामले यांच्या गोड भाषाणाचा त्यांच्यावर परिणाम होईलच. घोडं मैदान आता काही दूर नाही. पाहूया.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in