Jawan Review : बहुचर्चित 'जवान' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला ; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शाहरुखच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Jawan Review : बहुचर्चित 'जवान' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला ; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बॉलीवूडचा किंग शाहरूख खान गेल्या काही दिवसापासून चांगलाच चर्चेत आहे. 'पठाण' नंतर प्रेक्षकवर्ग त्याच्या 'जवान' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते आणि आज अखेर 'जवान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा आज सगळीकडे रिलिज झाला आहे. 'जवान' प्रदर्शित होण्याआधी त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत होती. सगळयांना हा चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा होता. अनेक ठिकाणी मध्यरात्री 2.15 पासून शो चालू झाले आहे. तर काही ठिकाणी पहाटे 5 वाजता सुरू करण्यात आले आहेत. मुंबईतील गेटी गॅलेक्सीमध्ये पहाटे 6 वाजता 'जवान' चा फर्स्ट डे फर्स्ट शो सुरू झाला.

त्यानंतर, शाहरुखच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत या चित्रपटाबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही दिवसांपुर्वी शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा रिलिज झाला आणि त्याने अनेक रेकॉर्ड मोडले होते. या चित्रपटासोबतच शाहरुखने तब्बल चार वर्षानंतर कमबॅक केलं. 'जवान' चे काही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाला सर्वांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रेक्षकवर्ग चित्रपट पाहतांना नाचून आणि गाऊन थिएटरमध्ये जल्लोष करताना दिसत होते. केआरकेने ट्विट करत लिहिले आहे की, "'जवान' हा एक उत्तम चित्रपट आहे. उत्तम अॅक्शन, अभिनय, उत्तम कथा आणि उत्तम संगीत. हा एक संपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट आहे. अ‍ॅटली दुसऱ्या इंटरव्हलमध्ये देखील ही जादू कायम ठेवेल, अशी आशा करतो. जवान हा चित्रपट व्यवस्थेवर आणि भ्रष्टाचारावर डायरेक्ट हल्ला करणारा आहे. शाहरुखने दोन्ही भूमिका साकारतांना दमदार असा अभिनय केला आहे. शाहरुख आणि नयनताराने आपापल्या भूमिका उत्कृष्टपणे साकारल्या आहे संजय दत्त याने खूप चांगले सरप्राईज दिलं आहे. विजय एक प्रभावी खलनायक आहे. फुल ऑन मसाला सिनेमा आहे. हा चित्रपट एकदा बघाच सगळे", असं केआरकेने म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in