'संघर्षयोद्धा' चित्रपटात सैराट फेम अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका; पोस्ट शेअर करत दिली माहिती

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातून घेतला जाणार आहे.
'संघर्षयोद्धा' चित्रपटात सैराट फेम अभिनेता साकारणार महत्त्वाची भूमिका; पोस्ट शेअर करत दिली माहिती
PM

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटातून घेतला जाणार आहे. येत्या 26 एप्रिल 2024 रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. याचं चित्रीकरण जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू आहे. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. हा अभिनेता या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहे.

अरबाज शेख साकारणार भूमिका-

'सैराट' या चित्रपटातील सलीम शेख म्हणजेच सल्या ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख हा 'संघर्षयोद्धा- मनोज जरांगे पाटील' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. अरबाज शेखने 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्याने, "राज्यभर चर्चेत असणारा चित्रपट संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटात मी महत्वाची भूमिका बजावत असून या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका बजावत असलेले रोहन पाटील यांच्या सोबतचा हा शूट लोकेशनचा फोटो", असे कॅप्शन दिले आहे. अरबाजने शेअर केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कोणते कलाकार साकारणार भूमिका-

गोवर्धन दोलताडे यांनी 'संघर्षयोद्धा' या चित्रपटाची कथा आणि निर्मिती केली आहे. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुधीर निकम यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, जयवंत वाडकर यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in