शाहरुखच्या 'जवान' सिनेमातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला ; एका तासात मिळाले तब्बल 'एवढे' व्ह्यूज

'पठाण' चित्रपटातील दुसरं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'चलेया' असं या गाण्याचं नाव असून हे एक रोमँटिक गाणं आहे.
शाहरुखच्या 'जवान' सिनेमातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला ; एका तासात मिळाले तब्बल 'एवढे' व्ह्यूज

'पठाण' या चित्रपटाला मिळालेल्या अफाट प्रतिसादानंतर आता बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला लवकरचं येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षकवर्ग आतूरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्या पाठोपाठ या चित्रपटाचे पहिले गाणे 'जिंदा बंदा' हे प्रदर्शित करण्यात आले होते. आता नुकतचं या चित्रपटातील दुसरे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. 'चलेया' असं या गाण्याचं नाव असून हे एक रोमँटिक गाणं आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे.

शाहरुखने या गाण्याचा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत शाहरुखने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की "इश्क हो बेहिसाब सा, बेपरवाह, बेहद सा, कुछ ऐसा है जवान का प्यार." या गाण्यामध्ये शाहरुख खान आणि नयनतारा यांचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. या गाण्याच्या माध्यमातून तब्बल ४ वर्षांनंतर शाहरुखचा रोमँटिक अंदाज पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यूट्यूबर एका तासात या गाण्याला १३ लाख पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

शाहरुखचा 'जवान' हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून. या चित्रपटात शाहरुखच्या जोडीला साऊथची तगडी स्टारकास्ट सुद्धा असणार आहे. यामध्ये शाहरुखबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्या पण प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, प्रियमणी, गिरिजा ओक, संजिता भट्टाचार्य, लहर खान, सान्या मल्होत्रा, आलिया कुरेशी, रिद्धी डोंगरा, सुनील ग्रोव्हर आणि मुकेश छाबरा हे कलाकारही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. हिंदीसोबतच हा चित्रपट तमिळ, तेलगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in