'द एक्सोरसिस्ट: बिलीवर'चा दुसरा ट्रेलर समोर ; हार्ट पेशंट असाल तर सावधान...

या चित्रपटाचा ट्रेलर इतका भयानक आहे की, अनेक नेटकऱ्यांनी तो पाहताना प्रेक्षकांनी काळजी घ्यावी असं म्हटलं आहे.
'द एक्सोरसिस्ट: बिलीवर'चा दुसरा ट्रेलर समोर ; हार्ट पेशंट असाल तर सावधान...

हॉलीवूडच्या हॉरर चित्रपटांची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. त्या चित्रपटांना कायम मोठा प्रतिसाद मिळत आला आहे. याआधी हॉलीवूडच्या भयपटांनी बॉक्स ऑफिवर खूप मोठी कमाई केली होती. अशातच आता 'द एक्सोरसिस्ट - बिलीवर'चा दुसरा ट्रेलर समोर आला आहे. त्या ट्रेलरवर प्रेक्षकांनी कौतुकांचा वर्षाव केला आहे.

आर युनिव्हर्सल पिक्चर्सच्या वतीनं यावर्षीचा सर्वात मोठा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्या चित्रपटाचं नाव 'द एक्सोरसिस्ट' असं आहे. हा चित्रपट सहा ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर इतका भयानक आहे की, अनेक नेटकऱ्यांनी तो पाहताना प्रेक्षकांनी काळजी घ्यावी असं म्हटलं आहे. भयपट हा प्रेक्षकांचा अतिशय आवडीचा विषय आहे त्यावर आधारित चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल नेहमी जास्त असतो.

पुढील महिन्यात ६ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत असून तो पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. द एक्सोरसिस्टमध्ये अकादमी पुरस्कार प्राप्त अभिनेत्री एलेन बर्स्टिन, जेनिफर नेटल्स आणि ऐन डाऊड मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. त्याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in