
शाहरुखनच्या 'जवान' या चित्रपटाची त्यांच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. या सिनेमातील गाण्यांनी चाहत्यांच्या मनावर गारुड केलं आहे. आता या चित्रपटाचा धम्माकेदार असा ट्रेलर समोर आला आहे. यात शाहरुख हा वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत आहे. या ट्रेलरमधील अॅक्शन सीन्स आणि डायलॉग्जने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. नेटकऱ्यांनी ट्रेलरवर कमेंट करत शाहरुखचं कौतूक केलं आहे.
या ट्रेलरची सुरुवात "एक राजा था एक के बाद एक जंग हारता गया" या डायलॉगने होते. त्यानंतर या ट्रेलरमध्ये काही अॅक्शन सिन्स दाखवले आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अभिनेता शाहरुख खानसह दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतूपती, दीपीका पादुकोण आणि नयनतारा यांची देखील झलक पाहायला मिळते. तसंच या ट्रेलरच्या शेवटी रमैया वस्तावैया हे गाणं ऐकू येतं. या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता शिखेला पोहचली आहे.
'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'जवान' हा अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित असा सिनेमा असून त्याचे चाहते या सिनेमाची आतूरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तसंच हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेत देखील हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून चित्रपटातील काही गाणी आणि प्रिव्ह्यू काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
या चित्रपटातील 'जिंदा बंदा', 'चलेया' आणि 'नॉट रमैया वस्तावैया' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या गाण्यांना नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळाली होती. तसंच शाहरुखचा हटके अंदाज या गाण्यातून बघायला मिळाल होता.
जवान हा सिनेमा अॅटलीनं दिग्दर्शित केला असून या चित्रपटात सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य यांनी देखील महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. हा चित्रपट किती मजल मारतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.