A Valentine s Day: सीरियल किलर की आहे प्रेमाचा खेळ? ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Upcoming Marathi Movie: बहुप्रतिक्षित ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. २१ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
A Valentine s Day: सीरियल किलर की आहे प्रेमाचा खेळ? ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Published on

Trailer: अ व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेमाचा दिवस. परंतु या चित्रपटात प्रेमाचा एक वेगळाच खेळ पाहायला मिळेल. ट्रेलरची एक झलक प्रेक्षकांना या चित्रपटातील गूढ रहस्य उलगडवण्यासाठी आकर्षित करत आहे. प्रेक्षकांचा ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळतोय. हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. शिवाय अदिन माजगांवकर आणि अली माजगांवकर हे बालकलाकार देखील आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे आहेत. येत्या २१ जूनला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होईल.”

गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी, प्रस्तुतकर्ते एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे श्री.फैरोज अनवर माजगावकर, श्री.अमजद हुसैन निराळे, श्री.श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून श्री.अनिल वहाने आणि श्री.सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटाचे निर्माते आहेत.

हे ही वाचा

A Valentine s Day: सीरियल किलर की आहे प्रेमाचा खेळ? ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
New York Times Square: ‘हा’ चित्रपट ठरला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट!

साई पियुष,ऍलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे. तसेच ‘ब्लू लाइन म्यूजिक’ ही म्युझिक पार्टनर कंपनी आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच माझ्या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित झाल ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तसंच आता डोन्ट वरी हे गाणं सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात आता या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे माझ्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे की हा चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करेल. आणि लोकांच्या पसंतीस पडेल. ही अपेक्षा मी व्यक्त करतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव जरी प्रेमावर आधारित असलं तरी यामागे दडलेलं भयानक कृत्य आहे ते तुम्हाला चित्रपटगृहातच पाहायला मिळेल. माझी रसिक प्रेक्षकांना एकच विनंती आहे की या चित्रपटातील ट्रेलर आणि गाण्यांना तुम्ही जो प्रतिसाद दिलात तोच प्रतिसाद २१ जूनला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नक्की द्याल. आणि आपला मराठी चित्रपट यशाच्या शिखरावर घेवून जाल.”

logo
marathi.freepressjournal.in