'घूमर' या सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडिया वर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट परत भारतातील क्रीडा चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे असा विश्वास निर्मात्यांना आहे. 'घूमर' हा आर. बाल्की यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. येवढेच नव्हे तर 'पा', 'चीनी कम', आणि 'पॅड मॅन' सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. 'घूमर' हा सिनेमा 18 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा बहुचर्चित 'घूमर' या सिनेमाचा ट्रेलर आज रिलिज करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना प्रेरणा ,अनोख्या भावना आणि परिवर्तनात्मक कथेचा अनुभव येणार असल्याचं दिसून येत आहे. या ट्रेलब्लॅझिंग सिनेमॅटिक चित्रपटात अभिषेक बच्चन एका प्रशिक्षकाची भूमिका साकारताना दिसत आहे. त्याच्या आयुष्याला अनपेक्षित वळण तेव्हा येते, जेव्हा तो एका पॅराप्लेजिक खेळाडूला प्रशिक्षण देताना दिसतो. या खेळाडूची भुमिका सैयामी खेर ही साकारणार आहे. या सिनेमामध्ये सैयामी ही डाव्या हाताने खेळणाऱ्या क्रिकेटपटूची भूमिका साकारत आहे.
ट्रेलरची सुरवात ही अभिषेक बच्चनच्या डायलॉगने होते, जो मद्यधुंद अवस्थेत दिसतो. सैयामी खेर जी अंगदच्या प्रेमात आहे. पण तिच्यासाठी क्रिकेट हे सर्वस्व आहे. प्रेमापेक्षा पण जास्त महत्त्वाचं आहे. सैयामीची भारतीय संघात निवड झाल्यानंतर तिच्या आयुष्यात तुफान येतं आणि एका अपघातामध्ये तिचा एक हात तिला गमवावा लागतो. त्यानंतर तिच्या खऱ्या संघर्षाची कहानी सुरु होते.
चित्रपटाची ही कथा ऋषी वीरमानी आणि राहुल सेनगुप्ता यांच्यासोबत लिहिली आहे. हंगेरियन उजव्या हाताची नेमबाज कॅरोली टाक्स हिच्या कथेपासून हा चित्रपट प्रेरित आहे, ज्यात तिच्या दुसऱ्या हाताला गंभीर दुखापत झाल्यानंतर तिने डाव्या हाताने खेळून दोन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली होती. घूमरमध्ये अभिषेक बच्चन, शबाना आझमी, अंगद बेदी यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत. इनवाका दास आणि शिवेंद्र सिंग हे 'घूमर' चित्रपटातून पदार्पण करत आहे.