The Vaccine War: आगामी चित्रपटाबाबत विवेक रंजन अग्निहोत्रीने केला मोठा खुलासा!

चित्रपटसृष्टीतील निर्माती पल्लवी जोशी आणि निर्माते विवेक अग्निहोत्री (The Vaccine War) यांनी नेहमीच संशोधनावर आधारित चित्रपट बनवण्यावर भर दिला आहे.
The Vaccine War: आगामी चित्रपटाबाबत विवेक रंजन अग्निहोत्रीने केला मोठा खुलासा!
Published on

चित्रपटसृष्टीतील निर्माती पल्लवी जोशी आणि निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी नेहमीच संशोधनावर आधारित चित्रपट बनवण्यावर भर दिला आहे. (The Vaccine War) त्यांचा 'द ताश्कंद फाईल्स'हा चित्रपट अडीच तासांच्या तार्किक चर्चेवर आधारित असून या चित्रपटाच्या संशोधनासाठी बराच वेळ देऊन त्यांनी मेहनत केली. त्याचप्रमाणे, विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांचा 'द काश्मीर फाइल्स'हा चित्रपट सत्य परिस्थितीवर आधारित असून, यासाठी निर्मात्यांनी एक वर्ष अभ्यास आणि संशोधन केले होते.

आपला देशही गेल्या दोन वर्षात आघातातून जात आहे. जग अद्याप एक फॉर्मुला बनवण्यासाठी धडपडत करत असतानाच, लस बनवण्यात यश आलेल्या काही देशांपैकी एक म्हणून भारत उदयास आला आहे. लस तयार करण्यासाठी अनेक भारतीय शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी आपले दिवस रात्र एक केली. जिथे लोक कोरोनावरील विजयाचा आनंद साजरा करण्यात व्यस्त होते तिथे काही एजन्सी, पक्ष आणि मीडिया हाऊसेस सतत या विजयाची बदनामी करण्याच्या दिशेने वाटचाल करत होते. तेव्हापासून, विवेक अग्निहोत्री नक्षलवाद्यांविरुद्ध लढत असून त्यांचा पर्दाफाश करत आहेत. अशातच, आयएमबुद्धा आणि टीम एक वर्षाहून अधिक काळ यावर संशोधन आणि अभ्यास करत असून सर्व वैध कागदपत्रांसह सज्ज आहेत.

याबाबत बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, "जेव्हा आपला देश महामारीच्या काळात संघर्ष करत होता तेव्हा जे काही चुकीचे होते त्या प्रत्येक गोष्टीचे संशोधन करण्यासाठी आम्ही खरोखर कठोर परिश्रम करत आहोत. आता आम्ही एका वर्षाच्या संशोधनासह तयार आहोत, ५२ लोक ज्यांनी रात्रंदिवस एक करून ते कार्यान्वित केले आणि याला ८००० पानांत समअप केले."

सोशल मीडियावर शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले, "आमची टीम जवळपास एक वर्षाहून अधिक काळ भारताने कोविडशी कसा लढा दिला यावर संशोधन करत आहे. आम्हाला असे तपशील मिळाले आहेत ज्याने कोणत्याही व्यक्तीला आपले शास्त्रज्ञ आणि त्यांच्या नेतृत्वाचा अभिमान वाटेल. मला समजत नाही की आपली मीडिया असे संशोधन का करत नाहीत जेणेकरून तरुणांना भारताचा अभिमान वाटेल? हे त्यांचे काम नाही का?"

हे वर्ष विवेक अग्निहोत्रीने या प्रकल्पासाठी केलेल्या सर्व परिश्रमाचे फळ असताना, भारतीय चित्रपट निर्मात्याने 'द काश्मीर फाइल्स'च्या यशाचा आनंद घेतला ज्याने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आणि २०२२च्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

logo
marathi.freepressjournal.in