'...तर हात गमवावा लागला असता', सर्जरीनंतर सैफला मिळाला डिस्चार्ज

सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतरचा त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. एका वृत्तवाहिनीला त्याने आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
'...तर हात गमवावा लागला असता', सर्जरीनंतर सैफला मिळाला डिस्चार्ज
Published on

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याला सोमवारी सिनेमाच्या सेटवर चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर सैफला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डिस्चार्ज मिळाल्यानंतरचा त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. एका वृत्तवाहिनीला त्याने आपल्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

शस्त्रक्रिया झाल्यानंतर सैफ अली खान म्हणाला, 'माझ्या गुडघ्यावर आणि पाठीवर शस्त्रक्रिया झाली नाही. मला ट्रायसेप्सचा त्रास होत होता. देवरा या चित्रपटासाठी अ‍ॅक्शन सीन करत असताना वेदना होऊ लागल्या. म्हणून मी एमआरआय करून घेतला' आणि डॉक्टरांनी मला तातडीने शस्त्रक्रिया करायला सांगितले. ‘ही दुखापत आणि त्यानंतर झालेली शस्त्रक्रिया हा आम्ही करत असलेल्या कामाचाच भाग आहे. डॉक्टरांची साथ असल्यामुळे माझी प्रकृती आता स्थिर आहे. माझ्या हितचिंतकांचे देखील आभार मानतो. जर शस्त्रक्रिया झाली नसती तर हात गमवावे लागले असते. माझे हात (शस्त्रक्रिये नंतरचे हात बघून) शाबूत असल्यामुळे मी आनंदी आहे’ असं देखील सैफ म्हणाला.

सैफ एका महिन्याच्या सुट्टीवर

शस्त्रक्रियेनंतर सैफने बरा होण्यासाठी एका महिन्याचा ब्रेक घेतल्याची मुलाखतीत माहीती दिली आहे. दुखापत खूप गंभीर नव्हती, पण तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. आता शस्त्रक्रिया झाली आहे, मी काम करू शकतो. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण झाले आहे. त्यामुळे आता मी एका महिन्याची रजा घेत आहे. कोकिलाबेन रुग्णालयात उत्तम काळजी घेतली गेली, उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळाली आता सर्व काही चांगले आहे, असेही त्याने सांगितले.

सैफ अली खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता त्याच्या प्रकृतीमुळे चर्चेत आला. सैफ याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. चाहते कायम सैफच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.

logo
marathi.freepressjournal.in