'या' प्रसिद्ध मराठी कलाकारांनी देखील केले म्हाडाच्या घरांसाठी अर्ज

'या' प्रसिद्ध मराठी कलाकारांनी देखील केले म्हाडाच्या घरांसाठी अर्ज

आतापर्यंत म्हाडाच्या माध्यमातून अनेक मराठी कलाकारांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे
Published on

मराठी कलाकारांनी नेहमीप्रमाणे आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीत अर्ज केले आहेत. या अर्जदारांची प्रारुप यादी सोमवारी प्रसिद्द झाली आहे. बिग बॉस सिझन ४ जा विजेता अक्षय केळकर, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्विक प्रताप , अभिनेत्री श्वेता खरात, योगिता चव्हाणक, आश्विनी कासार यांच्यासह अनेक कलाकारांनी मुंबईतील घरांसाठी अर्ज केले आहेत.

मुंबईसारख्या माहागड्या शहरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य लोकांपूढे म्हाडा हाच एकमेव पर्याय असतो. मराठी चित्रपट तसंच मालिका क्षेत्रातील कलाकारांना देखील देखील स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या पर्याय योग्य वाटतो. यामुळे मराठी कलाकार प्रत्येक सोडतीत मोठ्या संख्येने अर्ज करतात. आतापर्यंत म्हाडाच्या माध्यमातून अनेक मराठी कलाकारांचं घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

यंदा मुंबईत म्हाडाच्या घरांच्या होणाऱ्या सोडतीत मराठी कलाकारांनी अर्ज केले आहेत. बिग बॉस विजेता आणि सध्याचा ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाचा सुत्रसंचालक अक्षय केळकर याने पहाडी गोरेगाव आणि मागाठाणेमधील घरांसाठी एकूण तीन अर्ज भरले आहेत. तर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रतापने मुंबईतील घरासाठी अर्ज केला आहे. त्याने गोरेगाव आणि विक्रोळीतील घरासाठी अर्ज केले आहेत.

तर 'सावित्रीजोती' आणि 'गुन्ह्याला माफी नाही' या मालिकेतील अभिनेत्री अश्विनी कासार, 'जीव माझा गुंतला'मधील योगिता चव्हाण यांनी देखील मुंबई घरांसाठी अर्ज केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in