'ही' अभिनेत्री रमली विठुरायाच्या भक्तीत...

आषाढी एकादशीनिमित्त खास भेट
'ही' अभिनेत्री  रमली विठुरायाच्या भक्तीत...

'मुलगी झाली हो' मालिकेतून घराघरात पोहोचलेली ‘माऊ’ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर आता नव्या भूमिकेत समोर येणार आहे. 'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटात ती दिसणार आहे. विठ्ठलाच्या भक्तीत रमलेल्या सोज्वळ मुलीच्या भूमिकेत ती दिसणार आहे. संदीप मनोहर नवरे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. वारी न अनुभवता येणाऱ्या प्रेक्षकांना या चित्रपटाच्या रुपाने वारीचा सोहळा आणि विठूरायाच्या दर्शनाचा अनुभव घ्यायला मिळणार आहे. 'आषाढी एकादशी'चं निमित्त साधून २३ जूनला प्रदर्शित होणारा हा चित्रपट विठ्ठल भक्तांसाठी आनंदवारी असेल.

दिव्या पुगावकर याबद्दल सांगते, ‘विठ्ठलाला मानणारी ही व्यक्तिरेखा असून ‘विठ्ठल’ तिचा 'सोबती' होऊन तिला कशी मदत करतो, भक्तीचा मार्ग तुम्हाला संकटातून तारून नेत असतो हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने खूप छान अनुभव मला घेता आला. उत्तम दिग्दर्शक, सहकलाकार आणि निर्मिती संस्थेसोबत काम करण्याचा आनंद नक्कीच आहे. ''

'विठ्ठल माझा सोबती' या चित्रपटात दिव्या पुगांवकरसह अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिरसाटकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, अभय राणे यांसारख्या दर्जेदार कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळतील. या चित्रपटाची उत्कंठावर्धक कथा संदीप मनोहर नवरे यांनी लिहिली असून पटकथा-संवाद विक्रम एडके यांचे आहेत. गौरव चाटी आणि गणेश सुर्वे यांचं सुमधुर संगीत या चित्रपटाला लाभलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in