'या' मराठी अभिनेत्याचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश ; पोस्ट शेअर करत दिली माहिती

अभिजीत केळकरने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज(३० ऑगस्ट) भाजपामध्ये जाहीररित्या प्रवेश केला आहे.
'या' मराठी अभिनेत्याचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश ; पोस्ट शेअर करत दिली माहिती

मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने अनेक चित्रपटात जबदस्त कामगिरी केली आहे. ' मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ', 'काकस्पर्श' अश्या लोकप्रिय सिनेमात त्याने काम केलं आहे. नुकतंच अभिजितने भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. याबाबत त्याने स्वतः त्यांच्या सोशल मीडियावरून माहिती दिली आहे.

अभिजीत नेहमी सोशल मीडियाद्वारे प्रत्येक घडामोडींवर आपलं परखड मत व्यक्त करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करणारी पोस्ट देखील शेअर केली होती, जी चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर आता त्याने निर्भीडपणे बोलण्यासाठी राजकारणात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिजीत केळकरने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज(३० ऑगस्ट) भाजपामध्ये जाहीररित्या प्रवेश केला आहे. अभिजीतने बावनकुळे आणि प्रिया बेर्डे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, "भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश…जसं ते म्हणतात, तुमचं व्यवस्थेत असणं महत्त्वाचं आहे. ती बदलण्यासाठी…किती काळ काठावर उभं राहून नावं ठेवायची? त्या प्रवाहात सामिल होऊन, समजून घेऊन, काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया…"

अभिजीतची ही पोस्ट पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. एका चाहत्यानं लिहिलं आहे की, "मनापासून अभिनंदन", तर दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं आहे, "जबरदस्त सरप्राइज दिलं. पूर्णपणे अनपेक्षित होतं. नवीन वाटचालीसाठी तुला शुभेच्छा." अभिजितच्या या निर्णयाने सगळीकडे त्याचे कौतुक केलं जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in